Rain Forecast
Rain ForecastAgrowon

Paus Andaj: राज्यात पावसाला पोषक हवामान; मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Maharashtra Weather: हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.
Published on

Pune News: हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. उन्हाचा चटका वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. राज्याच्या इतर भागातही उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. चंद्रपूर येथे सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

Rain Forecast
High Temperature : उन्हाच्या चटक्यात राज्य होरपळणार

हवामान विभागाने अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच उद्या अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्टही देण्यात आला. तसेच विदर्भातील आणखी काही भागात पुढील ३ दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. अकोला जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवारी, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आज तसेच शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

Rain Forecast
Marathwada Weather: विदर्भात तापमान ४५ अंशावर; राज्यातील बहुतांशी भागात उष्णता वाढण्याचा अंदाज

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. सोलापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस, सांगली जिल्ह्यात आज आणि उद्या, सातारा, नगर तसेच पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. कोकणातही उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली.

राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात आज, उद्या आणि रविवारी हलक्या सरींचा अंदाज देण्यात आला. सांगली जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार, सोलापूर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार, बीड जिल्ह्यात शनिवारी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com