Pune Rain: ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक ३४० मिलिमीटर पावसाची नोंद

Maharashtra Weather Update: जिल्ह्यातील पश्चिम भागातील भोर, मावळ, मुळशी, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे.
Tamini Ghat Rain
Tamini Ghat RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: जिल्ह्यातील पश्चिम भागातील भोर, मावळ, मुळशी, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. मंगळवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक ३४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

या पावसामुळे कळमोडी, वडिवळे, कासारसाई, खडकवासला अशा काही धरणांतून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली आहे.मागील चोवीस तासांमध्ये लोणावळा घाटमाथ्यावर १६९, वळवण ११७, शिरोटा ५३ या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला. तर अनेक मंडळात जोरदार पाऊस झाला.

Tamini Ghat Rain
Karul Ghat Landslide: करूळ घाटात दरड कोसळली

त्यामुळे ओढे, नाले भरून वाहत असून नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाली आहे. कळमोडी धरण ९५ टक्के भरले आहे. पाऊस व धरणात येणारा येवा पाहता पुढील काही तासांत कोणत्याही क्षणी कळमोडी धरण शंभर टक्के भरून अनियंत्रित विसर्ग आरळा (भीमा) नदीमध्ये चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ३८८३ क्युसेक विसर्ग वाढवून सकाळी ११ वाजता ७७०० क्युसेक करण्यात आला. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी, जास्त करण्याची शक्यता आहे.

Tamini Ghat Rain
Tamhini Ghat Rain: ताम्हिणीत ३७० मिलिमीटर पाऊस

कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नदीपात्रात १३६० क्युसेकने सुरू असणारा विसर्ग वाढवून २०४० क्युसेकने करण्यात येत आहे. वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामधील विसर्ग वाढवून ३६२० क्युसेकने करण्यात येत आहे.

आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी (माळीण) येथे सोमवारी (ता.२३) पहाटे साडेपाच वाजता दरड कोसळली. सुदैवाने यात जीवित व वित्तहानी झाली नाही.

मंगळवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये : स्रोत - कृषी विभाग)

हवेली - उरुळीकांचन ५०, खेड २६, चिंचवड ३७,मुळशी - पौड ३७, सावरगाव ३७, कोळवण ४५, माण ५२,भोर - भोर २९, भोलावडे ३४, आंबवडे ६६, संगमनेर २९, निगुडघर ६६, हर्नास २९,मावळ - वडगाव मावळ, तळेगाव ४४, काले ६९, कार्ला, खडकाळा, ताकवे ९६, लोणावळा, कुसगाव १४२, शिवणे, परिंदवाडी ५२, ताकवे, वाडेश्वर ६७,वेल्हा - वेल्हा ३४,खेड - पाईट ३२, चाकण ३५, करंजविहीरे ३२,आंबेगाव - आंबेगाव ५६,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com