Maharashtra Rain Alert: विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्याच्या अनेक भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Forecast : राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. तर अनेक भागात पावसाची उघडीप आहे. राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. तर अनेक भागात पावसाची उघडीप आहे. राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही भागात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. 

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. विदर्भातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच खानदेशातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकणातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Rain Alert
Maharashtra Rain : घाटमाथा, कोकणात पावसाच्या मध्यम सरी

उद्याही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान  विभागाने दिला. तर पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

Rain Alert
Weather Forecast : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

तसेच मराठवाड्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. कोकणातही सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारीही राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com