El Nino Heatwaves : ‘एल निनो’च्या स्थितीमुळे अधिक उष्णतेची लाट

India Climate Research: भारतीय हवामान विभागाने केलेल्या नव्या संशोधनात ‘एल निनो’च्या स्थितीमुळे या वर्षी दक्षिण भारतात अधिक उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ‘एल निनो’चे प्रभाव आणि स्थानिक वातावरणीय बदलांमुळे उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढणार आहे.
Heatwave
HeatwaveAgrowon
Published on
Updated on

Pune News: उत्तर आणि ईशान्य भारताच्या तुलनेत, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात (मध्य आणि वायव्य भारत) ‘एल निनो’ची स्थिती पाहता या वर्षात अधिक उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांनी नव्याने केलेल्या संशोधनातून निरीक्षण नोंदविण्यात आले आहे, अशी माहिती हवामान विभागातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, ‘इन्सो लिंक्ड कॉन्ट्रास्टिंग हीट वेव्ह पॅटर्न ओव्हर द इंडियन रिजन’ या शीर्षकाचा अभ्यास, हा ६ एप्रिल रोजी ‘क्लायमेट डायनॅमिक्स’ या एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला. त्यामध्ये हवामान विभागातील शास्त्रज्ञ एस. डी. सानप, पी. प्रिया, जे. एस. चौधरी, डी. आर. पट्टनायक यांच्यासह अनेकांनी या अभ्यासात भाग घेतला होता.

Heatwave
Maharashtra Weather: उष्णता ठरतेय असह्य; राज्यातील बहुतांशी भागात तापमानात झाली मोठी वाढ

२०२२ मध्ये याच काळात मध्य आणि उत्तर भारतात ‘एल निनो’ची तीव्रता दिसून आली होती. मात्र आता वातावरणाचा अभ्यास करून उपरोक्त अंदाज वर्तविण्यात आला आहे. ‘एल निनो’ वर्षांमध्ये, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सामान्यपेक्षा जास्त कमाल तापमान, वाढलेली उष्णतेच्या लाटेची घटना आणि कमी पर्जन्यमान अनुभवले जाते. याउलट, वायव्य भारतात सामान्यपेक्षा थंड तापमान आणि जास्त पर्जन्यमान दिसून येते.

या अभ्यासामुळे आम्हाला वातावरणीय परिस्थिती आणि हवामानावर त्यांचा प्रभाव समजून घेण्यास मदत होते. विशेषतः उन्हाळ्याचा अंदाज सुधारण्याला यामुळे आम्हाला मदत होईल. या अभ्यासाद्वारे उष्णतेच्या लाटेच्या नमुन्यांचे संशोधन योग्य प्रकारे झाले आहे, अशी माहिती या संशोधनातील सहभागी आणि आयएमडी पुणे येथील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली. तसेच त्यांनी या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.

Heatwave
Heatwave Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण हवामानाचा इशारा

पुढे उष्णतेच्या लाटेचे नमुने समजून घेण्यासाठी जागतिक स्तरावर इतर टेलिकनेक्शन नमुन्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच उष्णतेच्या लाटेवर परिणाम करणारे इतर अनेक घटक आहेत ज्यात उष्णतेच्या लाटेच्या अंदाजात स्थानिक वातावरणीय घडामोडींचा समावेश आहे, असेही सानप म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार होत आहे. त्यातच वातावरणात सतत बदल होत आहे. सध्या वाढत असलेल्या उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यावर हवामान विभागाकडून सातत्याने अभ्यास करण्यात येत आहे.
एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com