Maharashtra Weather
Maharashtra WeatherAgrowon

Maharashtra Weather: उष्णता ठरतेय असह्य; राज्यातील बहुतांशी भागात तापमानात झाली मोठी वाढ

Maharashtra Heatwave Alert: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाचे प्रमाण वाढले आहे. दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवत असल्याने घराबाहेर पडणे अशक्य होत आहे.
Published on

Pune News: राज्यातील पावसाचे वातावरण दूर झाले. तसे बहुतांशी भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. विदर्भात तुलनेत तापमान अधिक दिसत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाचे प्रमाण वाढले आहे. दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवत असल्याने घराबाहेर पडणे अशक्य होत आहे.

राज्यात मागील दोन आठवडे वादळी पावसाचे वातावरण होते. त्यामुळे तापमानात काहीसे चढ उतारही झाले. सरासरी तापमान काहीसे कमी झाले होते. पण आता पावसाचे वातावरण निवळले.

Maharashtra Weather
Heatwave Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण हवामानाचा इशारा

त्यामुळे उन्हाचा चटका पुन्हा वाढला. विदर्भात भंडारा आणि गोंदीया वगळता इतर जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला. तर अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्येही तापमान ४३.४ अंशावर पोचले होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बहुतांशी भागात तापमान ४० अंशाच्या दरम्यान पोचले.

Maharashtra Weather
Maharashtra Weather: राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता

हवामान विभागाने आज अहिल्यानगर, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिला. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, पुणे, सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आला. तसेच सातारा आणि बीड जिल्ह्यात उद्या ऊन जास्त राहण्याचा अंदाज आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. तर अकोला जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com