

Weather Update : माॅन्सून मागील सहा दिवसांपासून एकाच जागेवर ठाण मांडूण आहे. माॅन्सून वाटचाल करेल, असे वाटत असतानाच चक्रीवादळाने खोडा घातला होता. पण चक्रीवादळामुळे अडकलेल्या माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे.
माॅन्सून पुढील ४८ तासांमध्ये म्हणजेच दोन दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला.
मॉन्सूनने अरबी समुद्रातील प्रगती करत शुक्रवारी म्हणजेच २ जून रोजी लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंका, संपूर्ण कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली होती. यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले आहे.
साधारणतः ८ जूनपर्यंत मॉन्सून अरबी समद्रात येण्याची शक्यता हवामान विभागाने यापुर्वीच वर्तविली होती. पण चक्रीवादळामुळे माॅन्सूनची वाटचाल थांबली होती. २ जूनपासून माॅन्सून या भागातच मुक्काम ठोकून आहे. आजही माॅन्सूनची प्रगती दिसली नाही.
आज दक्षिण अरबी समुद्रामध्ये पश्चिमेकडील वाऱ्याचे प्रवाह वाढले. साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिमेकडील वाऱ्याचे अस्तित्व आहे. आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळ किनारपट्टीवर ढगांचेी रेलचेल वाढली. यामुळे केरळमध्ये पुढील ४८ तासांत म्हणजेच दोन दिवसांत माॅन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.
तसेच पुढील ४८ तासांमध्ये आणखी काही भागांमध्ये माॅन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. माॅन्सून दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण लक्षद्वीप, मालदीव आणि कोमोरीन भाग आणि नैऋृत्य भारतातील काही भाग, मध्य आणि वायव्य पश्चिम बंगाल आणि आग्नेय आशियातील काही भागांमध्ये प्रगती करण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.