Monsoon
MonsoonAgrowon

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

Latest Monsoon Update : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) अंदमानात आगमन झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
Published on

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) अंदमानात आगमन झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अंदमानात दोन दिवस अगोदरच दाखल झालेला मॉन्सून यंदा ४ जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.

दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैॡत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अंदमान-निकोबार बेट समूह आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे.

Monsoon
El Nino Impact on Commodity : अल निनोचा शेतीमाल बाजारावर काय परिणाम होईल?

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. यंदा दोन दिवस अगोदरच मॉन्सून शुक्रवारी (ता. १९) अंदमानात दाखल झाला आहे. मॉन्सूनचे केरळमधील आगमन ४ जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे.

Monsoon
Monsoon Update : मॉन्सून कधी दाखल होणार?

मॉन्सूनच्या पावसावर ‘एल निनो’चे सावट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने, मॉन्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, यात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे.

मॉन्सूनचे अंदमानातील आगमन

वर्ष---आगमन

२०१८---२५ मे

२०१९---१८ मे

२०२०---१७ मे

२०२१---२१ मे

२०२२---१६ मे

२०२३---१९ मे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com