Monsoon in Andaman: माॅन्सून अंदमानात दाखल; पुढील ३ दिवसात आणखी पुढे सरकणार

Early Monsoon 2025: यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा ५ दिवस आधी अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी विस्तृत भागात प्रगती करणार आहे.
Monsoon
MonsoonAgrowon
Published on
Updated on

Pune News: माॅन्सूनची वाटचाल यंदा वेगाने सुरु आहे. माॅन्सून सरासरी वेळेच्या ५ दिवस आधीच अंदमानात दाखल झाला. माॅन्सूनने दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत वाटचाल केली. पुढील ३ ते ४ दिवसांत माॅन्सून आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

निकोबार बेटांवर मागील २४ तासांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर मागील २ दिवसांमध्ये काही भागात सर्वदूर पाऊस पडत आहे. मागील २ दिवसांमध्ये पश्चिमी वाऱ्यांचा वेग आणि खोली दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात वाढला आहेत.

Monsoon
Maharashtra Rain Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस गारपिटीचा इशारा

पश्चिमी वाऱ्यांचा वेग समुद्राच्या सरासरी पातळीच्या १.५ किलोमीटर उंचीवर २० नाॅट्सपेक्षा अधिक आहे. तर दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात पश्चिमी वाऱ्यांची खोली ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. 

Monsoon
Pre Monsoon Rain: मॉन्सूनपूर्व पावसाचा मराठवाडा, नाशिकमध्ये जोर

वरील सर्व घडामोडी लक्षात घेऊन माॅन्सून आज दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्रात, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे.

त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांत माॅन्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा काही भाग तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, उरलेला अंदमान समुद्राचा भाग आणि बंगालाच्या उपसागराच्या काही भागात प्रगती करेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com