Maharashtra Monsoon 2023 Update: राज्यात पावसाचा जोर कमी झाला; काही ठिकाणी हजेरी !

Maharashtra Rain Update : हवामान विभागाने आज कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.
Dam
DamAgrowon
Published on
Updated on

Rain Alert Update From IMD : मध्य प्रदेश आणि शेजारच्या परिसरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. त्यामुळे राज्यातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पण राज्याच्या इतर भागात आज पावसाचा जोर कमी होता.

उत्तर छत्तीसगड आणि शेजारच्या ईशान्य मध्य प्रदेश तसेच आग्नेय उत्तर प्रदेशच्या भागात असलेल्या ठळक कमी दाब क्षत्राची तीव्रता कमी झाली. ही स्थिती ईशान्य मध्य प्रेदश आणि शेजारच्या भागात कमी दाब क्षेत्रात रुपांतरीत झाली आहे. यासोबतच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. माॅन्सूनचा आस असलेले कमी दाब क्षेत्र पंजाबमधील अमृतसर, कर्नाल, दिल्ली, हमीरपूर भागात आहे. कमी दाब क्षेत्राचं केंद्र ईशान्य मध्य प्रदेश, रांची, दिघा आणि बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात आहे.

Dam
Monsoon 2023 : विदर्भ, मराठवड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज !

राज्यातील पावसाचा जोर कालपासून कमी झालेला दिसत आहे. काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला. पण पावसाचा जोर कमी होता. काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडल्या. पण जोरदार पाऊस आज दिसला नाही. हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसचे विदर्भातील वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि मुंबई तसेच नाशिक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना तर खानदेशातील जळगाव, नंदूरबार आणि धुळे या  जिल्ह्यांमध्ये विजांसह काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. तर राज्याच्या इतर भागातही हलक्या सरी पडतील, असाही अंदाज दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com