Winter Update Maharashtra : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ हेप्टापास्कल इतका मध्यम स्वरूपाचा हवेचा दाब बुधवार (ता. २४) पर्यंत राहील. त्यानंतर गुरुवारी (ता.२५) हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१४ हेप्टापास्कलपर्यंत वाढेल. त्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहील. सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १४ किमी इतका अधिक राहील.
कोकणामध्ये वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर व परभणी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. त्याचा परिणाम थंडीच्या तीव्रतेवर होऊन थंडीचे प्रमाण सौम्य राहील. आकाश ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ, वर्धा, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण सौम्य राहील.
तशीच स्थिती वाशीम, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत देखील राहण्यामुळे थंडीचे प्रमाण सौम्यच राहील. ढगाळ हवामान व थंडीवर परिणाम करणारे घटक म्हणजे वाऱ्याच्या दिशेमध्ये होणारे बदल हेच होय. हवामान बदलाने अशाप्रकारे बदल होत आहेत.
प्रशांत महासागराचे व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान समान म्हणजे ३० अंश सेल्सिअस राहील. तसेच बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात थंडीचे प्रमाण चांगले राहील. तशीच स्थिती नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांतही राहील.
कोकण ः
कमाल तापमान रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७७ टक्के राहील.
ठाणे व पालघर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते २९ टक्के राहील. उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३४ टक्के राहील. कोकणात हवामान ढगाळ व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५ ते ६ किमी तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ६४ टक्के, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ४३ ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २२ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ८ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा नाशिक जिल्ह्यात वायव्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.
मराठवाडा ः
कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यात कमाल तापमान तुलनेने अधिक राहील. किमान तापमान जालना जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ४८ टक्के राहील. तर लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५६ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २७ ते २९ टक्के राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १४ किमी राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ७ ते १० किमी राहील. धाराशिव, लातूर, परभणी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नयेकडून राहील.
पश्चिम विदर्भ ः
कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४८ टक्के, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ५३ ते ५५ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ किमी व दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ ः
नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान १७ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ टक्के राहील. वाऱ्याचा वेग नागपूर जिल्ह्यात ताशी ८ किमी, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ताशी १० किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ ः
गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस व गोंदिया जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ६१ ते ७१ टक्के तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ५४ ते ५७ टक्के राहील. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३८ टक्के, तर भंडारा जिल्ह्यात ४२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ५ ते ६ किमी, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ८ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा व नगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर, पुणे जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सोलापूर व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५८ टक्के राहील. तर उर्वरित जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३१ ते ३२ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत २६ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून, तर उर्वरित जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.
कृषी सल्ला ः
- उन्हाळी हंगामातील ढोबळी मिरची, डबलबीन, मुळा, गाजर, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी मूग, तीळ, बाजरी या पिकांच्या पेरणीसाठी हवामान उत्तम आहे.
- आंबा मोहराचे संरक्षण करावे.
- उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड करून घ्यावी.
- उन्हाळी हंगामात उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होण्याकरिता ठिबक सिंचन प्रणालीची पाहणी करून घ्यावी. आवश्यकतेनुसार दुरुस्तीची कामे करावीत.
- जनावरांना उन्हाळी हंगामात चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी चारा पिकांची लागवड करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.