Cold Weather Update : मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहणार

Winter Update : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड आणि धुळे येथे पारा १० अंशांच्या खाली आहे.
Cold weather
Cold weather Agrowon
Published on
Updated on

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड आणि धुळे येथे पारा १० अंशांच्या खाली आहे. तर उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. आज (ता. २०) मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहण्याची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून, शुक्रवारी (ता. १९) राजस्थानातील बिकानेर आणि उत्तर प्रदेशातील कानपूर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर राजस्थान आणि हरियानामध्ये किमान तापमान २ ते ५ अंशांच्या दरम्यान आहे.

तर पंजाब, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात थंडीचा कडाका कायम आहे. उत्तर भारत आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर कायम राहणार आहे. उत्तरेकडे थंडीच्या लाट आणि थंड दिवस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

Cold weather
Cold Weather Update : किमान तापमानात घट कायम राहणार

उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते १९ अंशांच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून, उर्वरित राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Cold weather
Nanded Weather : नांदेडला थंडीचा कडाका वाढला

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.५ (११.७), नगर २७.८ (१२.४), धुळे २८ (९.५), जळगाव २९.८ (११.३), कोल्हापूर २९.२ (१६.१), महाबळेश्‍वर २१.८ (१२.५), नाशिक २७.९ (१२.१), निफाड २९.४ (९.२), सांगली ३०.५ (१५.४), सातारा २८.२ (११.९), सोलापूर ३२.६(१७.४), सांताक्रूझ २९ (१६.९), डहाणू २८.१ (१६.५), रत्नागिरी ३०.२ (१८.२),

छत्रपती संभाजीनगर २८.४ (१२.८), नांदेड ३०.२ (१७), परभणी ३०.६ (१५.८), अकोला ३०.९ (१८), अमरावती २९.६ (१६.५), बुलडाणा २९.६ (१६.५), ब्रह्मपुरी ३१.५ (१७.५), चंद्रपूर ३०.६ (१६), गडचिरोली २९.६ (१५.६), गोंदिया २६.५ (१५.६), नागपूर २७.७ (१६.१), वर्धा २९.२ (१६.४), वाशीम ३१.२ (१३.८), यवतमाळ ३१.२ (१६.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com