Cold Weather
Cold WeatherAgrowon

Cold Weather Update : किमान तापमानात घट कायम राहणार

Winter Season : उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्याच्या किमान तापमानात घट झाली.
Published on

Pune Weather News : उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्याच्या किमान तापमानात घट झाली. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे. मात्र उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. आज (ता. १९) किमान तापमानात वाढ-घट होत गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी होत असून, गुरुवारी (ता. १८) पंजाबच्या लुधियाना येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

पंजाब, हरियाना, चंदीगड, राजस्थान उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये दाट धुक्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार राज्यात थंडीच्या लाट आणि थंड दिवस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

Cold Weather
Nanded Weather : नांदेडला थंडीचा कडाका वाढला

उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात किमान तापमानात वाढ-घट सुरूच राहून गारठा कायम राहण्याचा हवामान विभागाने वर्तविली आहे.

Cold Weather
Weather Update : थंडीचा जोर वाढला, रब्बीला पोषक हवामान, आणखी किती दिवस थंडी राहणार?

गुरुवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.५ (११.५), नगर ३०.० (१३.४), धुळे २९.० (९.५), जळगाव ३०.१ (१०.३), कोल्हापूर ३१.१ (१५.६), महाबळेश्वर २४.६ (११.९), नाशिक २८.० (१३.६), निफाड २९.० (९.०), सांगली ३१.८ (१४.८), सातारा ३१.७ (१२.०), सोलापूर ३३.८(१६.५), सांताक्रूझ २९.१ (१७.५), डहाणू २७.१ (१६.०), रत्नागिरी २९.४ (१८.६),

छत्रपती संभाजीनगर २९.६ (१३.६), नांदेड ३१.८ (१८.२), परभणी ३०.८ (१६.३), अकोला ३१.४ (१६.२), अमरावती २९.० (१७.३), बुलडाणा २९.० (१५.६), ब्रह्मपुरी २९.९ (१८.५), चंद्रपूर ३०.८ (१६.८), गडचिरोली २९.० (१६.४), गोंदिया २८.६ (१८.६), नागपूर २८.६(१८.६), वर्धा ३०.०(१८.०), वाशीम ३१.५ (१४.२), यवतमाळ ३१.२ (१६.७).

उटी येथे पारा शून्य अंशांजवळ

उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातही किमान तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निलगिरी पर्वतातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या उटी येथे तापमानाचा पारा शून्य अंशांजवळ आला आहे.

तसेच उदगमंडलम (उटी) येथील कंथाल, थलाईकुंथा येथे १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या भागात दव आणि धुके पडल्याचे दिसून आले. या थंड हवामानामुळे चहाच्या लागवडीवर परिणाम होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com