Weather Update : राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on: 
Updated on: 

Maharashtra Weather : पावसाने उघडीप दिल्यानंतर मंगळवारी (ता. २१) सकाळी मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींनी शिडकावा केला. बुधवारी (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उकाड्यातही वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रात येथे राज्यतील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १३ अंशांच्या पुढे कायम आहे.

सोमवारी (ता. २०) रात्री कोकणात पावसाला सुरुवात झाली. तर मंगळवारी सकाळी कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली.

Weather Update
Weather Update : राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

दक्षिण श्रीलंकेपासून तमिळनाडू, रायलसीमा, तेलंगणा, विदर्भ ते मध्य प्रदेशपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाहदेखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.

बुधवारी (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.


रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :


पुणे ३१.२ (१७.१), जळगाव ३२.२ (१६.८), धुळे ३१.० (१३.२), कोल्हापूर ३१.७ (१९.०), महाबळेश्वर २६.६ (१२.३), नाशिक २९.४ (१८.४), निफाड ३५.०(१३.८), सांगली ३१.२ (१७.९), सातारा ३१.३ (१५.४), सोलापूर ३३.४(१९.३), सांताक्रूझ ३१.८ (२१.२), डहाणू २९.६ (१९.९), रत्नागिरी ३१.७

(२१.१), छत्रपती संभाजीनगर ३०.५ (१३.२), नांदेड ३२.६ (१९.६), परभणी - (१९.१), अकोला ३३.३ (२०.५), अमरावती ३२.०(१८.०), बुलढाणा ३०.२ (१९.२), ब्रह्मपूरी ३३.४ (२०.६), चंद्रपूर ३५.६ (२०.०), गडचिरोली ३१.६(१७.०), गोंदिया ३१.२ (१९.५), नागपूर ३२.० (१९.७), वर्धा ३३.६(२०.४), वाशीम ३३.० (१६.२), यवतमाळ ३३.२ (१९.५).

Weather Update
Weather Update : वादळी पावसाचा अंदाज कायम

विजांसह पावसाची शक्यता : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com