

Pune Rain News : राज्यातील बहुतांश भागात मॉन्सून सक्रिय होत आहे. मंगळवार (ता. १८) पासून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलका पाऊस पडत आहे.
दरम्यान, हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे.
यामुळे खरिपात रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असून ज्या ठिकाणी पिके उगवून आली आहेत, तेथील पिकांना दिलासा मिळणार आहे.
कोकणातील ठाणे, रत्नागिरी, सिंदुधुर्ग जिल्ह्यांतील अनेक भागांत दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडला. तर पालघर, रायगड जिल्ह्यांतील सर्वदूर जोरदात ते मुसळधार पाऊस कोसळला आहे.
मंगळवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगडमधील माणगाव येथे सर्वाधिक २५०, तर पेण येथे २२१.३ मिलिमीटर पाऊस पडला. पनवेलमध्ये ९९.८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणातील पाण्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा भात रोपे पुर्नलागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
मागील काही दिवस या भागात भात लागवडी रखडलेल्या होत्या. खानदेशातील नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक पाऊस होता. तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कडगाव ८३.३, चंदगड ८२.८, काळे कॉलनी ६६.३, खडकाळा ६५.८, शिवणे ६०.३ मिलिमीटर पाऊस पडला. अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या दिलासा मिळाला.
मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाचा शिडकावा झाला आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. तर कारखेली ३८.३, पूर्णा ३५.५, कंठेश्वर ४८.३, हत्ता ३०.५ मिलिमीटर पाऊस पडला असून कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना आधार मिळाला. मात्र, अनेक काही भागात अजूनही पाऊस नसल्याने पिके संकटात आली आहेत. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती तयार झाली आहे. पेरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे.
पूर्व विदर्भातील अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पश्चिम विदर्भातील रिसोड, बारव्हा, मुरमाडी, सालेकसा, साखरीतोला, देवरी, चिंचगड, सिंदीबीरी, कारोडी, नावेगावबंध, बोधगावदेवी, अर्जुनीमोरगाव, महागाव, कशोरी, घोटनगाव, दाबा, ब्रम्हपुरी, अन्हेर नावरगाव, चौगुण, सावळी, पाथरी या भागात मध्यम पाऊस पडला. पूर्व विदर्भातील धानोरा ९४, घोट ९०.८, पुराडा ८४.८, गडचिरोली ८०.५, मुरूमगाव ७८.३, गत्ता ७१.५, अल्लापल्ली ७०.८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या भागातील धान पिकांना चांगलाच फायदा झाला असून पीके वाढीच्या अवस्थेत आहेत.=
घाटमाथ्यावरही मुसळधार
गेल्या दोन दिवसापासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. खोपोलीच्या घाटमाथ्यमावर सर्वाधिक २१५ मिलिमीटर पाऊस पडला. ताम्हिणी २१५, लोणावळा २०८ मिलिमीटर पाऊस पडला. तर दावडी १८४, डुंगरवाडी १८०, शिरगाव १६८, शिरोटा १२२, वळवण १३८, आंबोणे १६०, भिवपुरी ११५, कोयना १३३, भिरा १३४, धारावी ११८ मिलिमीटर पाऊस पडला. ठाकूरवाडी, खांड या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडला. त्यामुळे नद्या, नाल्यातील कमी झालेला प्रवाह पुन्हा वाढल्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही धरणांतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.
शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे (स्त्रोत कृषी विभाग) : अलिबाग ११२.५, पोयनाड १४०, किहीम, सरल १२४.५, चरी ११२.५, चौल, रामराज १४०, पोयंजे १७४, ओवाले १११, करनाला १५१.५, कर्जत १८७.८, नेरळ १११.५, काढव १३०, कशाळे ११९.५, चौक १८७.८, वावोशी १९२.३, उरण १३६.८, कोपरोली १५५, जसाई १३२, पाली १५४.५, आटोने १५९, जांभूळपाडा १५५.५,
हमरापूर, वाशी १५५, कासू १२५.५, कामरली १९२.३, महाड १५२.५, तुडील ११९.८, मानगाव १२५.५, इंदापूर १३९.९.५, गोरेगाव ११०.३, रोहा १३०.८, नागोठाणे १२५.३, चनेरा १४९.५, कोलाद १२७.८, पोलापूर १४३.८, वाकण १३८, मुरूड १०२, नांदगाव १५३, बोरली १४०, तळा १२५.३, मेंढा १४०.३, लोणावळा १३९.८, वेल्हा १०८.३, हेलवाक, मोरगिरी १०४.३, महाबळेश्वर १८८.५, एटापल्ली १५७, मुलचेरा १०३.८,
कोकण : वसई, निर्मल, मानिकपूर, मानदेवी ६६.३, आगाशी ७४.८, भाईंदर ६०, बेलापूर, कल्याण, तळोजे, दहीसर ६५, कल्याण ६८, कुंभारली ७९.३, मोराबे ९२.५, कळंब ८७.३, खोपोली ७६.५, बिरवडी ९६, करंजवाडी ९०.३, नाते ९५.८, खारवली ९६, लोणेरे ९२.५, निझामपूर ९८.५, कोढवी ९०.३, खामगाव ९५.५, आंबवली ७४.८, कुळवंडी ६२.८, बार्णे ६८.८, मंडणगढ ८०, म्हाप्रल ७२.८, अंगवली ६४.५,पाचल ६७.८, कडवल ७३.३, कसाल ६१,
मध्य महाराष्ट्र : शिरूड ५६, बोरकुंड, आर्वी ३९.३, पाचोरा ३३.३, नागरदेवळा ३०.३, भडगाव ४५, आमदडे ४८.५, माले ८५, मुठे ५७, भोलावडे ३७, निगुडघर ५८.३, वडगाव मावळ ५२.३, तळेगाव दाभाडे ३१, पानशेत ५६.३, विंझर ४९.५, परळी ४१.८, बामनोली ४१.५, केळघर ३५, कऱ्हार ३३.८, पाटण ३१, पासारणी ३९, धोम ३०.५, पाचगणी ३३, तापोळा, लामज ४०.८, बाजार भोगाव ३३.५, करंजफेन ३५, आंबा ४९.५, राधानगरी ३०.८, कसबा तराळे ३०.८, गगनबावडा ४१.३, गवासे ४४.३, मानगाव ३४, तुरकेवाडी ३८.५, हेरे ४२,
विदर्भ - विहाद ४१, पोरली ५६.८, येवली ५२, ब्रहामनी ६२.५, कुरखेडा ६२.५, काठोळी ४०.८, माळेवाडा ६०, अरमोरी ३३.५, पिसेवादथा ५५.३, आष्टी ४७.५, येनापूर ३७, बामनी ६६, अहेरी ५३.८, जीमलगत्ता ६१, पेरमिली ५६.३, कमलापूर ५६.३, खामचेरू ६७, कासानसूर ६१, जावरवंडी ४६, चातगाव ६२.५, पेंढारी ६३.५, कारवाफा ६१, कोर्ची ६८.०, बेडगाव ७८.५, कोतगुल ५७.८, मासेली ६०.३, लागम ५०.८, तरडगाव ५२.५, भामरागड ४०.५.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.