Summer Heat Update : राज्यात उन्हाळ्याची चाहूल

Weather Update : राज्यात ढगाळ हवामान, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाळ्याची चाहूल लागल्याची चिन्हे आहेत.
Summer Heat
Summer HeatAgrowon

Pune News : राज्यात ढगाळ हवामान, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाळ्याची चाहूल लागल्याची चिन्हे आहेत. उन्हाच्या झळा वाढल्या असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. आज (ता. १६) राज्यात तापमानातील वाढ, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडी कमी झाली असून, पंजाबच्या अमृतसर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. छत्तीसगड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. त्यापासून विदर्भ, तेलंगणा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे.

Summer Heat
Weather Update : तापमानातील वाढ कायम राहणार

राज्यात ढगाळ हवामान अनुभवायला मिळत असतानाच, उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे. बुधवारी (ता. १५) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

अनेक ठिकाणी कमाल तापमान ३३ अंशांच्या वरच आहे. राज्यात किमान तापमान १० अंशांच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे. आज (ता. १४) उन्हाचा चटका, उकाडा आणि तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

Summer Heat
Weather Update : राज्यात कोरडं हवामान राहणार की पाऊस पडणार? 

गुरूवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.६ (१४.१), धुळे ३०.० (११.०), जळगाव ३१.३ (१४.६), कोल्हापूर ३३.२ (१९.७), महाबळेश्वर २८.७ (१६.५), मालेगाव ३२.८ (१५.६), नाशिक ३१.८ (१३.६), निफाड ३०.१ (१०.४), सांगली ३३.८ (१८.१), सातारा ३३.४ (१६.०), सोलापूर ३६.० (२२.४), सांताक्रूझ ३३.२ (१८.०), डहाणू २९.३ (२०.०), रत्नागिरी ३२.४ (१९.१),

छत्रपती संभाजीनगर ३१.५ (१६.२), नांदेड ३१.८ (२१.२), परभणी ३२.१ (१७.९), अकोला ३३.१ (२०.०), अमरावती ३१.६ (१७.२), बुलढाणा ३१.८ (१७.०), ब्रह्मपूरी ३३.० (१९.८), चंद्रपूर ३२.० (१७.०), गडचिरोली ३१.२ (१७.२), गोंदिया ३१.० (१८.२), नागपूर ३१.२(१९.५), वर्धा ३२.५(१९.५), वाशीम ३३.६ (१६.४), यवतमाळ ३२.५ (१६.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com