

Weather Update Pune : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र मध्य भारताकडे आल्याने राज्यात पाऊस वाढण्यास पोषक हवामान आहे. आज (ता. १६) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, कोटा, रायसेन, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, संबलपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. नैॡत्य राजस्थानपासून उत्तर ओडिशापर्यंत, तसेच पूर्व-मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्रापासून मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कोकणपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
राज्यात ढगाळ हवामान झाले असून, अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १६) उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, विदर्भातील अकोला, वाशीम जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर उर्वरित कोकण, नगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कमी दाब क्षेत्र गुजरातकडे सरकतेय
बंगालच्या उपसागरात तयार झालेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, पूर्व मध्य प्रदेश आणि परिसरावर सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पश्चिमेकडे सरकत असलेली ही प्रणाली पुढील तीन ते चार दिवसांत मध्य प्रदेशातून गुजरातकडे जाण्याचे संकेत आहेत.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अकोला, वाशीम.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ.
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
सांगली, सोलापूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.