Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Weather Forecast: कोकण, घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. काही घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. राज्यात अवघ्या २२ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: कोकण, घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. काही घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. राज्यात अवघ्या २२ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळी आठपर्यंत कोयना (पोपळी) या घाटमाथ्यावर सर्वाधिक १०८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. सततच्या पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच धरणांत वेगाने आवक वाढत असून धरणातील पाणी पातळी चांगलीच वाढली आहे.

मॉन्सून दाखल झाल्यानंतर सह्याद्रीच्या रांगामध्ये असलेल्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण हे दरवर्षी अधिक असते. यंदाही या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. शिरगाव घाटमाथ्यावर ९५ मिलिमीटर, तर दावडी ८५, आंबोणे, डुंगरवाडी ८०, ताम्हिणी ७५, लोणावळा ६३, वळवण ५४, भिरा ५३, खोपोली ४३ मिलिमीटर पाऊस पडला. तर शिरोटा, ठाकूरवाडी, भिवपुरी, कोयना-नवजा, खांड, धारावी या घाटमाथ्यावर हलका पाऊस झाला.

Heavy Rain
Monsoon Rain: विदर्भ आणि कोकणातील काही भागात पावसाचा अंदाज

कोकणात दोन दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. परंतु अनेक भागांत पावसाची संततधार सुरूच आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील १३ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे भात खाचरे तुडुंब भरली आहेत. अनेक ठिकाणी भात खाचरे ओसंडून वाहत असल्याने ओढे, नाले चांगलेच प्रवाही झाले आहेत. त्यामुळे कोकणातील धरणांत आवक वाढत असून ५० टक्क्यांहून अधिक धरणे भरली आहेत.

मध्य महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात हलका ते मध्यम सरी कोसळत आहेत. तर कोल्हापुरातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. उर्वरित भागात तुरळक सरी पडल्या असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पुणे जिल्ह्यात गेले दोन ते तीन दिवसांपासून पश्चिम पट्यात पाऊस पडत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. मुळशी धरणक्षेत्रात ९५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

Heavy Rain
Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर

पावसामुळे मागील चोवीस तासांमध्ये ७.७२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. अधूनमधून पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी पश्‍चिम पट्ट्यात पाऊस कायम आहे. पूर्व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात एक मंडलात अतिवृष्टी झाली. उर्वरित भागात अधूनमधून तुरळक सरी कोसळत आहेत. तर खानदेश, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेती कामांना व पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

अतिवृष्टी झालेली मंडले (मिलिमीटर) : स्रोत - कृषी विभाग

कोकण : चिपळूण ७७, खेर्डी, धामनंद, पाटगाव ८०, मार्गताम्हाणे, रामपूर, दाभोळ, गुहागर, तळवली, पाटपन्हाळे, मानगाव ७०, सौंदळ, ओनी, पाचल ८६, निरवडे ६५, कणकवली, वागदे ६६

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ८४, साळवण ७२

विदर्भ : पाटणबोरी ८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com