Maharashtra Rain Alert : विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

Rain Forecast : विदर्भासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून, उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Monsoon
MonsoonAgrowon
Published on
Updated on

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भासह राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १) विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अति दक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून, उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सरकला आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळापासून नालिया, मालेगाव, ब्रह्मपुरी, जगदलपूर, कलिंगपट्टनम, मध्य बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आहे. यातच दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. पावसाच्या उघडिपीमुळे तापमानाचा पारा तिशी पार गेल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ कायम आहे.

Monsoon
September Rain Alert : राज्यात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस; मराठवाड्याच्या काही भागत जोर कमीच राहण्याची शक्यता: हवामान विभाग

शनिवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये यवतमाळ आणि जेऊर येथे उच्चांकी ३४.५ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १) पूर्व विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’, आहे. तर नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह मध्यम ते जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

Monsoon
Rain Update: उद्या मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

असना’ चक्रीवादळ किनाऱ्यापासून दूर सरकले

अरबी समुद्रातील ‘असना’ चक्रीवादळ भारताच्या किनाऱ्यापासून दूर वायव्येकडे ओमानच्या दिशेने सरकत आहे. शनिवारी (ता. ३१) ही प्रणाली गुजरातच्या नालियापासून ३६० किलोमीटर पश्चिमेकडे होती. उद्यापर्यंत (ता. २) या चक्रीवादळाची तीव्रता ओसरणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तीव्र झाले असून, ही प्रणाली दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ आली आहे. शनिवारी (ता. ३१) मध्यरात्री ही प्रणाली विशाखापट्टनम आणि गोपाळपूरजवळ जमिनीवर येण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, परभणी, हिंगोली, अकोला.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : धुळे, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com