Monsoon Rain : पावसाचा जोर काही भागात कायम; राज्यात अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसान

Rain Update : राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी नाले खळाळून वाहत आहेत. काही भागात शेती पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे.
Monsoon
Monsoon Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी नाले खळाळून वाहत आहेत. काही भागात शेती पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

Monsoon
Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर दमदार पावसाचा अंदाज

तर नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, धाराशिव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज दिला. 

Monsoon
Monsoon Rain : धरणे भरायला सुरुवात

उद्या हवामान विभागाने रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर तसेच कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर सिंधुदूर्ग, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नागपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाडा आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. शनिवारीही याच भागात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील इतर भागात हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com