Hawaman Andaj: थंडी राज्यातून कायमची गेली का? राज्यातील बहुतांशी भागात किमान तापनातही वाढ

Weather Forecast: राज्यात थंडीचा प्रभाव कमी होत असून, बहुतांश भागात किमान तापमान झपाट्याने वाढत आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उन्हाच्या चाहुलीने हिवाळ्याचा शेवट झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Weather
WeatherAgrowon
Published on
Updated on

Pune News: यंदा फेब्रुवारी महिन्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली. किमान आणि कमाल तापमानातील तफावतही मोठी आहे. आज निफाडे येथील गहू संशोधन केंद्रात १०.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. तर सोलापूर येथे कमाल ३८.१ अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यातील तापमानात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

फेब्रुवारी महिन्यातील उष्णता असह्य होत आहे. राज्यातील कमी थंडी वाढलेल्या उष्णतेविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की,  महाराष्ट्रावर वारा-वहनाच्या पॅटर्नमध्ये काहीही बदल झाला नाही. तो आहे तसाच टिकून राहिला.

Weather
Heatwave in Maharashtra: मध्य महाराष्ट्र, विदर्भात उन्हाचा चटका वाढला; तापमान ३६ अंशांच्या वर

त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव तयार झाला. पर्यायाने उत्तरेतील थंड वारे महाराष्ट्रात पोहचलेच नाही . त्यामुळे काहीसे निरभ्र आकाश असूनही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष अशी थंडी आतापर्यंत महाराष्ट्रात जाणवली नाही. जी काही जाणवली ती चढ उतारासह केवळ किरकोळ अशीच थंडी जाणवली. 

Weather
Maharashtra Weather: सोलापुरात तापमान ३८ अंशावर; राज्यात सकाळी गारवा कमी झाला; दुपारी उन्हाचा चटका वाढला

मग आता थंडी गायबच झाली असे समजावे काय? याविषी श्री खुळे म्हणाले की, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात चमत्कारीकपणे हवेच्या दाबात आणि वारा वहन प्रणालीत जर अजूनही एकाकी काही बदल झाला तरच किमान तापमानाचा पारा खालावून थंडीची अपेक्षा करता येईल. अन्यथा नाही. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, उत्तर पुणे, उत्तर नगर, व उत्तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पहाटे काहीसा गारवा जाणवण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.

तसेच बंगालच्या खाडीतील सध्याच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे केवळ फक्त विदर्भातच आज आणि उद्या ढगाळ वातावरण राहून झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी नगण्य पावसाची शक्यता जाणवते, असेही खुळे यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com