Cyclone Michaung : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने पूर्व किनारपट्टीजवळ वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे.
Cyclone Michaung
Cyclone MichaungAgrowon
Published on
Updated on

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने पूर्व किनारपट्टीजवळ वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. आज (ता. ३) उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत असून, मंगळवारी (ता. ५) दुपारपर्यंत हे चक्रीवादळ नेलोर आणि मच्छलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) तीव्र होत आहे. शनिवारी दुपारी या प्रणालीचे केंद्र पदूचेरी पासून ४४० किलोमीटर, चेन्नईपासून ४२० किलोमीटर पूर्वेकडे, नेल्लूरपासून ५४० किलोमीटर, तर मच्छलीपट्टणम पासून ६५० किलोमीटर आग्नेय दिशेला होते.

Cyclone Michaung
Cloudy Weather : खानदेशात ढगाळ वातावरण; किमान तापमानात वाढ

पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकत असलेल्या या प्रणालीचे आज (ता.३) चक्रीवादळात रुपांतरण होणार आहे. उद्या (ता. ४) हे वादळ दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ येणार आहे. त्यानंतर उत्तरेकडे वळून ही प्रणाली मंगळवारी (ता. ५) दुपारपर्यंत आंध्रप्रदेशातील नेल्लोर आणि मच्छलीपट्टनमजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Cyclone Michaung
Weather Forecast : नाशिक जिल्ह्यात गारपिटीचा इशारा ; विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

किनाऱ्यालगत येताच या चक्री वादळामुळे ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहणार आहेत. यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यासह रायलसीमा, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्यासह समुद्र खवळल्याने एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत होणार असून, कच्ची, पक्की घरे, रस्ते, भात पीके, फळ पीके यांचे नुकसान होणार आहे. तसेच जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे पडणार असून, समुद्र खवळल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com