Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची संततधार

Heavy Rain Alert: मॉन्सूनने प्रवास पुन्हा सुरू केल्यानंतर कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही दमदार पाऊस कोसळत आहे.
Maharashtra Rain
Maharashtra RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: मॉन्सूनने प्रवास पुन्हा सुरू केल्यानंतर कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही दमदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत कोल्हापुरातील गगनबावडा येथे १७२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे नद्या, धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

राज्याच्या विविध भागात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पेरण्यांना सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी शेतीकामांमध्ये गुंतला आहे. काही ठिकाणी पिके उगवून वर आली आहे. या भागात सध्या अधूनमधून सरी कोसळत असल्याने पिकांनाही चांगलाच आधार मिळत आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात जोर वाढला आहे. त्यामुळे भात खाचरे भरून वाहत असून अनेक ठिकाणी धूळ वाफेवरील व एसआरटी पद्धतीच्या भात लागवडी खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी रोपवाटिकेच्या कामांना अडचणी आल्या आहेत.

Maharashtra Rain
Monsoon Rain: माॅन्सून पुन्हा सुसाट; मराठवाडा, खानदेशसह मध्य महाराष्ट्र व्यापला; उद्यापर्यंत संपूर्ण विदर्भही काबीज करणार

कोकणात धुव्वाधार :

कोकणात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार होत आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घडना घडल्या आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधारेने झोडपले आहे. सर्वाधिक फटका संगमेश्वर, राजापूर या दोन तालुक्यांना बसला आहे. संगमेश्वरमधील शास्त्री नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे रामपेठ बाजारपेठ जलमय झाली. संगमेश्वर- नायरी मार्गावर कसबा येथे पुराचे पाणी आले. तर धामणी गोळवली येथे भूस्खलन झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीत माती पसरली.

राजापूर तालुक्यात अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जवाहर चौकात पुराचे पाणी आले होते. पावसामुळे शेतीचे ६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. करूळ घाटात दरड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्यातील अनेक मार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प आहे. काही बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात जोर :

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भात खाचरे भरून वाहत आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. पश्चिम पट्यातील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यात पावसाचा जोर आहे. मावळातील कार्ला, खडकाळा, ताकवे येथे सर्वाधिक १२७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. सोमवारी (ता. १६) पंचगंगा नदीच्या पात्रात वाढ झाल्याने राजाराम बंधारा पाण्‍याखाली गेला. राधानगरी धरणातून २५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

कुंभी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली असून जून महिन्यात आजपर्यंत सरासरी ९५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पाटणला १४५.६, कराडला १२३.७, वाईला १०१.३, महाबळेश्वरला ६८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर पाऊस सुरू झाल्याने मशागत, पेरणी, ऊस, आले, हळद लागवड रखडली आहे.

मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरण :

मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण आहे. तर अधूनमधून ऊन पडत आहे. त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन, कपाशी पिके उगवून वर आली आहेत. त्यामुळे तुरळक ठिकाणी आंतरमशागतीचे कामांना सुरुवात झाली आहे. येत्या काळात या भागात चांगला पाऊस झाल्यास पिकांना चांगलाच दिलासा मिळून वाढ जोमदार होईल. परंतु काही ठिकाणी अति पावसामुळे अजूनही फारशा पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी झालेली मंडळे :

कोकण : भाईंदर ८६, अलिबाग, किहिम, सरल, नगांव ७८, पोयनाड, चौल, रामराज, महाड ८४, चौक ८२, वावोशी ७४, खोपोली ७९, उरण, कोपरोली, हमरापूर, वाशी ९८, पाली, पालघड ८७, आटोने ६८, जांभुळपाडा ६७, कसू, नाटे, गोरेगाव, लोणेरे ७०, कामरली ७२, बिरवडी १०२, करंवडवाडी ९५, खारवली १०२, तुडील, घोसाळे ८४, मानगाव, इंदापूर, निझामपूर ७७, नागोठाणे, सोनसाडे ७६, पोलापूर ७९, कोंडवी ८३, वाकण ७१, मुरूड, नंदगाव, बवरली, तळा ८४, चिपळून ११६,

Maharashtra Rain
Monsoon In India : मॉन्सूनचा पावसापलीकडचा प्रभाव

मार्गताम्हाणे, रामपूर ११७, वाहळ १३८, सावर्डे, आसुर्डे, वाकवली, खेड १२५, कळकवणे, शिरगाव ९१, दापोली १४६, बुरोंडी १३६, दाभोळ १६३, , शिर्शी ११९, आंबवली, कुळवंडी ९६, भरणे, दाभीळ, रत्नागिरी, खेडशी, पाली, फनसोप ११६, गुहागर, पाटपन्हाळे १२६, धामनंद, पाचल, खेर्डी १२१, तळवली १२३, आंबलोळी, हेदवी १३८, मंडणगड ७२, पावस, निरवडे १३१, जयगड १३८, कोठवडे १०६, मालगुंड, तरवल, फुंगुस, माभळे ११४, कडवई १२२, मुर्डव, माखजन १३८, फनसावणे, तेर्हे, राजापूर, आजगाव ११०, आंगवली, कोंडगाव ९३, देवळे ७३, देवरूख, तुळसानी १०२, सोंदळ, ओणी १२८, कोंडये १३३,

जैतापूर ७७, कुंभावडे १२०, नाते ९२, लांजा, सातवली, विळवडे १३१, भांबेड ९४, पुनस ९६, मीथबंब ९४, शिरगाव १२४, पाटगाव १३४, बापर्डे, तळेबाजार १२४, मालवण ८०, पेंडूर १३०, श्रावण ८८, आंबेरी ९०, पोयीप ७९, सावंतवाडी, बांदा १२७, मदुरा ११८, मांडखोल १२६, वेंगुर्ला, वेतोरे १३३, शिरोडा १२५, म्हापन ११६, कणकवली, सांगवे १०३, फोंडा १६३, नंदगाव १०५, वागडे ११७, कुडाळ १०७, कडवळ, माणगाव १३६, कसाळ १२४, वालावल ११६, पिंगुळी ८७, घोथोस १२६, मडगाव १३३, ओरस बु १२४, वैभववाडी १४७, येडगाव १३७, भुईबावडा १३५, तळवट १०७, भेंडशी ८८, मांडवी, निर्मल, माणिकपूर ८३, विरार ८२, कसा ६८,

मध्य महाराष्ट्र : माले, मुठे, कोळवण ७२, कार्ला, खडकाळा १२७, लोणावळा, कुसगाव ८६, ताकवे १२७, चारण ६५, बाजार ७३, करंजफेन ६६, आंबा ९३, कसबा ६५, राशीवडे ७०, गगनबावडा १७२, साळवण ९८, हलदी, शिंधनेरली, केनवडे, मुरगुड ८८, नेसरी ७०, कडगाव ८३, आजरा, गवसे, चंदगड, नारंगवाडी, माणगाव, तुर्केवाडी ७८, हेरे ८०.

- कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या.

- अनेक ठिकाणी ओढे, नाले खळाळले

- पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात संततधार कायम

- कोकणात १४८ मंडलांत अतिवृष्टी

- मध्य महाराष्ट्राच्या काही भाग, मराठवाडा व विदर्भात ढगाळ वातावरण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com