
Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२५) मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. परभणी जिल्ह्यात सरासरी १४.२ मिमी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात १३१ मिमी (९२२. ५ टक्के) म्हणजेच ९२.२५ पट तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ११.७ मिमी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात १३६.५ मिमी (११६६.७ टक्के) म्हणजेच ११६.६७ पट पाऊस झाला आहे. या दोन जिल्ह्यातील ८२ पैकी ६ मंडलात २०० मिमी पेक्षा जास्त तर ५७ मंडलात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. उर्वरित १९ मंडलात १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यात ५२ पैकी ३ मंडळामध्ये २०० मिमीपेक्षा जास्त तर ३८ मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. उर्वरित ११ मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.जिंतूर मंडलात सर्वाधिक म्हणजेच २३५.८ मिमी तर सिंगणापूर (ता. परभणी) मंडलात सर्वात कमी म्हणजेच ४०.९ मिमी पाऊस झाला.
सरासरी १३ पर्जन्य दिन (रेनी डेज) नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी ३ मंडलांमध्ये २०० मिमीपेक्षा जास्त तर १९ मंडळामध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. उर्वरित ८ मंडलामध्ये १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. वाकोडी (ता. कळमनुरी) मंडलात सर्वाधिक म्हणजे २०९.९ मिमी तर साळणा (ता. औंढा नागनाथ) मंडलात सर्वात कमी ४९.७ मिमी पाऊस झाला. सरासरी १० पर्जन्यदिनाची (रेनी डेज) नोंद झाली.
२०० मिमी पेक्षा जास्त पावसाची मंडले (एकूण ६)
परभणी जिल्हा ःजिंतूर २३५.८, सेलू २१७.८, देऊळगाव गात २१२.४. (एकूण ३), हिंगोली जिल्हा ः नरसी नामदेव २०९.९,वाकोडी २४७.३,वारंगा २०९.(एकूण ३)
१०० मिमी पेक्षा जास्त पावसाची मंडले (एकूण ५७)
परभणी जिल्हा ःझरी १०४.७, सावंगी म्हाळसा १७६.२, बामणी १४७.६,बोरी १४०.२, आडगाव १४०.२, चारठाणा १३२.६, वाघी धानोरा १४६.९, दूधगाव १०३.८, वालूर १९४.३, कुपटा १४९.२, चिकलठाणा १५२.८, मोरेगाव १८२.७, मानवत १२८.१, केकरजवळा १०६.९, कोल्हा १३२.९, ताडबोरगाव १४७.७, रामपुरी १२९.८, पाथरी १५८.३, बाभळगाव १७१.९, हादगाव १३८.७, कासापुरी १३९, सोनपेठ १३९.७, आवलगाव १४९.१, शेळगाव १४९.१, वडगाव १८५.५, गंगाखेड १३४.९, महातपुरी १३६, माखणी १२५.६, राणीसावरगाव १२४.५, पिंपळदरी १३९.३, पालम १०६.५, चाटोरी ११९.७, बनवस १५८.४, पेठशिवणी १६२.३, ताडकळस १५३, कात्नेश्वर १२८, चुडावा १२२, कावलगाव १३६.७ (एकूण ३८).
हिंगोली जिल्हाः हिंगोली १४७, सिरसम १२४.८, बासंबा १२३, डिग्रस १२७.४, माळहिवरा १३१.३, खंबाळा १२२.९, कळमनुरी १७४.१, नांदापूर १९३, डोंगरकडा १४५.८, आंबा १४१.२, हट्टा १११.७, कुरुंदा १२१.२, येळेगाव १५०.७, सेनगाव १९३.५, गोरेगाव १०२.५, आजेगाव १६२.७, साखरा १४६.५, पानकन्हेरगाव १९१, हत्ता १३५.२(एकूण १९).
१०० मिमी पेक्षा कमी पावसाची मंडले (एकूण १९)
परभणी जिल्हा ःपरभणी ८६.२, परभणी ग्रामीण ४६.७, पेडगाव ७७.३, जांब ५७.७, सिंगणापूर ४०.९, दैठणा ६१.६, पिंगळी ६०.५, टाकळी कुंभकर्ण ६७.२, रावराजूर ८५.७, पूर्णा ८३.५, लिमला ९२.३(एकूण ११).
हिंगोली जिल्हा ः आखाडा बाळापूर ९६.३, वसमत ९६.६, हयातनगर ८७.४, गिरगाव ९१.१, टेंभुर्णी ६९.४, औंढा नागनाथ ९७.९, साळणा ४९.१, जवळा बाजार ८७.१ (एकूण ८).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.