Maharashtra Weather: राज्यात थंडी वाढण्याची शक्यता; राज्यातील किमान तापमानात अद्यापही चढ उतार सुरुच

Cold Weather Update : राज्यातील तापमानात चढ उतार कायम दिसत आहेत. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडी वाढायला मदत होत आहे.
Cold Weather
Cold WeatherAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील तापमानात चढ उतार कायम दिसत आहेत. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडी वाढायला मदत होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा कमी झालेला दिसत आहे. राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडाचा कडाकाही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका सातत्याने कमी-अधिक होत आहे. आज राजस्थानमधील जैसलमेर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Cold Weather
Cold Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

तसेच उत्तर पंजाबपासून पश्चिम-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यातच पश्चिमी चक्रावातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. उत्तर भारतात तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Cold Weather
Weekly Weather : सौम्य थंडी, कोरड्या हवामानाचा आठवडा

राज्यातील अनेक भागात किमान तापमानात वाढ झाली होती. तर सकाळी थंडीही कायम दिसत आहे. आज राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १० अंशांपेक्षाही जास्त होते. त्यामुळे काही भागात थंडीचा कडाका कमी प्रमाणात जाणवला.

आज निफाड यथली गहू संशोधन केंद्रात १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील थंडी कायम राहून पुढील काळात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com