Weather Forecast : ढगाळ हवामानाचा अंदाज

Cloudy Weather : ढगाळ आकाश, पावसाची हजेरी यामुळे राज्यात थंडी ओसरली आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
Cloudy Weather
Cloudy Weather Agrowon
Published on
Updated on

Pune News : ढगाळ आकाश, पावसाची हजेरी यामुळे राज्यात थंडी ओसरली आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ११) राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडी कमी-अधिक होत असून, बुधवारी (ता. १०) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात थंडी कमी झाली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २४ अंशांच्या दरम्यान आहे.

Cloudy Weather
Cold Weather : सौम्य ते मध्यम थंडी; ढगाळ हवामान

अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यापासून दक्षिण गुजरातपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान झाले असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज (ता. ११) राज्यात ढगाळ हवामानासह पहाटेच्या वेळी धुक्याची दुलई पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

Cloudy Weather
Cloudy Weather : ढगाळ हवामान, पावसाने शेतकरी चिंताग्रस्त

बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २४.८ (१६.४), धुळे ३१.५ (१३.५), जळगाव ३०.७ (१६.२), कोल्हापूर २६ (१९.५), महाबळेश्‍वर १८.९ (१४.२), नाशिक २९.३ (१७.२), निफाड २९.३ (१७.२), सांगली २५.८ (१९.९), सातारा २५.७, सोलापूर २८.७ (१९.९), सांताक्रूझ ३१.९ (२२), डहाणू २७.२ (२१.६), रत्नागिरी २९.५ (२४.२),

छत्रपती संभाजीनगर २४.८ (१५.९), नांदेड २९.८ (१९), परभणी २४.६ (१८.२), अकोला २९.१ (१८), अमरावती २८.८ (१८.३), बुलडाणा २७.५ (१६.८), ब्रह्मपुरी ३३.३ (१८.१), चंद्रपूर ३०.२ (१५.८), गडचिरोली २९.४ (१६.६), गोंदिया ३०.३ (१८.२), नागपूर २८.६ (२०), वर्धा २७.८ (१९.८), वाशीम २५.६ (१६.२), यवतमाळ ३१.५ (१६.७).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com