Weather Forecast : विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Rain Update : निफाड येथे किमान तापमान ६.२ अंशांवर आहे. तर दुपारच्या वेळी ढगाळ हवामान आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : पावसाला पोषक हवामान होत असतानाच, उत्तर महाराष्ट्रात गारठा अनुभवायला मिळत आहे. निफाड येथे किमान तापमान ६.२ अंशांवर आहे. तर दुपारच्या वेळी ढगाळ हवामान आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे. आज (ता. २७) विदर्भात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. निफाड, धुळ्यामध्ये गारठा कायम आहे. तर दुपारी उन्हाचा वाढल्याने सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे.

Weather Update
Weekly Weather : विदर्भ, मराठवाड्यात अल्प पावसाची शक्यता

विदर्भपासून केरळपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. तर मालदीवपासून उत्तर कर्नाटकपर्यंत, तसेच पूर्वमध्य अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २७) विदर्भातील वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा असून, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा

सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.६ (१४.९), धुळे ३१.५ (११.०), जळगाव ३३.० (१५.४), कोल्हापूर ३३.४ (१९.४), महाबळेश्वर २९.४ (१७.४), मालेगाव ३१.५ (१३.२), नाशिक ३१.० (१४.६), निफाड ३०.४ (६.२), सांगली ३५.३ (१९.६), सातारा ३४.३ (१७.५), सोलापूर ३७.२ (२४.२), सांताक्रूझ ३५.७ (१९.८), डहाणू ३२.६ (१८.५), रत्नागिरी ३१.४ (१९.४),

छत्रपती संभाजीनगर ३२.२ (१७.९), नांदेड ३३.० (२३.०), परभणी ३३.५ (२२.०), अकोला ३३.९ (२०.३), अमरावती ३३.२ (१७.२), बुलढाणा ३१.० (१८.८), चंद्रपूर ३३.४ (१७.२), गडचिरोली ३१.० (१८.२), गोंदिया २९.४ (२०.२), नागपूर ३१.४(२१.५), वर्धा ३२.५(२१.८), वाशीम ३४.६ (१८.८), यवतमाळ ३४.० (१९.०).

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com