Weekly Weather: हलक्या पावसासह उघडिपीची शक्यता

Maharashtra Weather: महाराष्ट्रात १ ते ७ जूनदरम्यान हवामानात चढ-उतार राहणार आहेत. हवेचा दाब वाढल्याने बराच काळ पावसात खंड राहण्याची शक्यता आहे; काही वेळा हलक्या सरी पडू शकतात.
Weather Update
Cloudy Weather Agrowon
Published on
Updated on

Monsoon Update: महाराष्ट्रावर आज (ता.१ जून) पासून मंगळवार (ता.३ जून) पर्यंत हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे बराच काळ पावसात उघडीप राहील. तर काही वेळा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण होईल. बुधवार (ता.४ जून) पासून शुक्रवार(ता.६ जून) पर्यंत हवेचे दाब वाढून ते १००६ हेप्टापास्कल राहतील. तेव्हा बराच काळ पावसात उघडीप आणि काही वेळा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होईल. तर शनिवार (ता.७ जून) पुन्हा हवेचे दाब १००८ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. त्यामुळे पावसात उघडीप राहील.

नाशिक, धुळे, नंदुरबार, धाराशिव, लातूर, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम, सांगली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २३ ते २७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा बहुतांशी जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. विदर्भातील वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सर्वच जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. पश्चिम विदर्भ व मध्य विदर्भात वाऱ्याची दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील.

अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने बाष्पीभवनाचा वेग कायम राहील. त्यातून ढग निर्मिती होऊन पावसाची शक्यता निर्माण होईल. प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरुजवळ १८ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २७ अंश सेल्सिअस राहील. तेथील पाणी थंड राहण्यामुळे हवेचे दाब अधिक राहतील. इकडचे वारे तिकडे ढग वाहून नेणार नाहीत. ते भारताच्या दिशेनेच वाहतील. त्यामुळे जून महिन्यातही चांगला पाऊस होण्याची शक्यता निर्माण राहील.

Weather Update
Monsoon Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोर कमी राहणार

कोकण

आज (ता.१ जून) सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ मि.मी., रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २० मिमी., ठाणे जिल्ह्यात १२ मि.मी आणि पालघर जिल्ह्यात १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. ही स्थिती बुधवारपर्यंत (ता.४) राहील. त्यानंतर पावसाचे प्रमाण थोडे कमी होईल. सर्व जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग रत्नागिरी जिल्ह्यात ताशी ९ कि.मी., तर रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ताशी ११ कि.मी. राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ कि.मी. आणि पालघर जिल्ह्यात ताशी १७ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस व पालघर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस तर पालघर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७२ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज (ता.१ जून) नाशिक व धुळे जिल्ह्यांत ६ ते १६ मि.मी., तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २ ते ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी २० ते २७ कि.मी. राहील. नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत

कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ टक्के राहील तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ७० ते ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३० ते ५० टक्के राहील.

मराठवाडा

आज (ता. १ जून) लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ४ ते ६ मि.मी., तर धाराशिव जिल्ह्यात २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. त्यापुढे बुधवारपर्यंत (ता.४) पावसाची शक्यता राहील. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून, तर वाऱ्याचा ताशी वेग २० ते २४ कि.मी. राहील. कमाल तापमान धाराशिव जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर लातूर, बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान हिंगोली जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, नांदेड जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांत

२३ अंश सेल्सिअस, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील, जालना व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव जिल्ह्यात ८२ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ७२ ते ७९ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील.

Weather Update
Monsoon Rain Forecast : ऑगस्टमधील पावसाचा अंदाज

पश्चिम विदर्भ

आज (ता. १ जून) वाशीम जिल्ह्यात २५ मि.मी., बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ९ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. त्यापुढे बुधवारपर्यंत (ता.४) तसाच पाऊस होईल. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ताशी २२ कि.मी., बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ताशी २५ कि.मी. आणि वाशीम जिल्ह्यात ताशी २७ कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अमरावती व वाशीम जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३८ टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज (ता. १ जून) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात २५ मि.मी. पावसाची शक्यता असून बुधवार (ता.४) पर्यंत पावसाचे प्रमाण तसेच राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात १६ ते २१ कि.मी, तर दिशा वायव्येकडून राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, यवतमाळ जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ७३ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ३२ ते ३७ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज (ता.१ जून) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३१ ते ३५ मि.मी., तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २१ ते २५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. ही स्थिती बुधवारपर्यंत कायम राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ कि.मी. राहील. कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ८६ टक्के, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ४१ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ३२ टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

आज (ता.१ जून) पुणे जिल्ह्यात १८ मि.मी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत १० मि.मी., तर सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता राहील. बुधवारपर्यंत पावसाची शक्यता कायम राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा वेग सांगली जिल्ह्यात ताशी २६ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यात ताशी २० ते २४ कि.मी. राहील. कमाल तापमान सातारा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि सांगली जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ९२ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ८० ते ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील.

कृषी सल्ला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटिकेत गादीवाफ्यावर बियाणांची लागवड करून रोपे तयार करावीत.

नवीन फळबाग लागवडीसाठी काढलेले खड्डे रासायनिक खतमात्रा आणि शेणखताच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.

हलक्या जमिनीत वाफसा आल्यानंतर कुळवाने पूर्वमशागत करून नंतर पेरणी करावी.

जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळ मिश्रित पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे जंत निर्मूलन करून घ्यावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com