Monsoon Rain Forecast : ऑगस्टमधील पावसाचा अंदाज

Rain Update : महाराष्ट्रातील उर्वरित ३० जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली आहे. असमान वितरणामुळे हिंगोली जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

ऑगस्टमधील पावसाची स्थिती

यंदाच्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ‘ला- निना’ डोकावण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिना म्हणजे पावसाच्या खंडाचा महिना म्हणूनही ओळखला जातो. मात्र आता ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक, सरासरीइतका, किंवा सरासरीपेक्षा कमी अशा तीन प्रकारांत महाराष्ट्रात जिल्हावार पावसाचा अंदाज आहे.

सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्के आणि अधिक) पावसाच्या शक्यतेतील जिल्हे ः पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नागपूर.

सरासरीइतक्या (९६ ते १०४ टक्के) पावसाच्या शक्यतेतील जिल्हे ः नंदुरबार, जळगाव, जालना, बीड, नांदेड, परभणी, जालना, भंडारा.

सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५ टक्के) पावसाच्या शक्यतेतील जिल्हे ः धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, सांगली, भंडारा, नागपूर वगळता संपूर्ण विदर्भ, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.

Monsoon Rain
Monsoon Rain : ओल्या दुष्काळाचे काही भागांवर सावट

‘लान-िनना’

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ‘ला-निना’ दिसणार आहे. त्यामुळे ऑगस्टमधील एन्सो तटस्थेतील पहिले ३ आठवडे पावसासाठी अडथळा आणणारे नसले, तरी ही स्थिती अधिक जोरदार पावसासाठी पूरकही नाही.

आयओडी (भारत महासागरीय द्वि-ध्रुविता)

संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील दोन महिन्यांत आयओडी तटस्थ राहणार आहे. त्यामुळे ऑगस्टमधील पावसासाठी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पृष्ठभागीय पाण्याचे तापमान समान असणारी तापमानीय स्थिती पावसास अडथळा करणारी जरी नसली, तरी महाराष्ट्रात सध्या अधिक पावसाची गरज असताना ती पावसासाठी पूरकही नाही. म्हणजेच आयओडी स्थितीही योग्य नाही.

मॉन्सूनवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडविणारी राज्यातील तापमानाची स्थिती

कमाल तापमान

ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारी तीन वाजताचे कमाल तापमान हे ऑगस्टमधील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवसाचे तापमान अधिक म्हणून अधिक आर्द्रतेची निर्मिती आणि त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात पावसाची शक्यता काही भागांत सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

किमान तापमान

संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पहाटे ५ वाजताचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता अधिक आहे. ऑगस्ट महिन्यात काही भाग पावसाळी असेल, तर काही भाग ढगाळ जाणवेल आणि आकाश नेहमी अभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे.

Monsoon Rain
Maharashtra Rain Alert : राज्यात सर्वदूर पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

ऑगस्टमधील पावसाच्या खंडाची स्थिती

जेव्हा ऑगस्टमध्ये महाराष्ट्र आणि मध्य भारतात पावसाचा खंड येतो तेव्हा...

संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळच्या कोकणातील पश्‍चिम किनारपट्टी

आसामकडील पूर्वोत्तरातील ७ राज्ये

हिमालयाच्या पायाथ्यातील गंगेच्या खोरे प्रदेशातील सिक्कीम, हिमालयीन पश्‍चिम बंगाल

बिहार, झारखंड, तमिळनाडू व रायलसीमा

या वरील भागात अधिक तीव्रतेने पाऊस होतो. ऑगस्ट महिन्यातील टरसाईल वर्गीकृत श्रेणीनुसार या भागातील पावसाची तीव्रता पाहता, ऑगस्ट महिना हा पावसाच्या खंडाचा जरी असला तरी या वर्षीच्या ऑगस्टमध्ये कदाचित पावसाचे खंड ही जाणवणार नाही.

धरण क्षेत्रात ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती

ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा घाटमाथ्यावरच अधिक प्रमाणात असणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील धरण क्षेत्रात पावसाचा जोर टिकून राहणार असल्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील धरणे भरून ओसंडतील.

ऑगस्ट महिन्यापासून गोदावरी खोऱ्यातील यापुढील सर्व ओसंडणाऱ्या स्रोतांचे पर्जन्य जल प्रवाह हे आता जायकवाडीत जाणार आहेत. त्यामुळे जायकवाडीसह, उजनी धरण भरेल.

सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज

‘ला-निना’च्या साथीत सप्टेंबर महिन्यात नाशिक आणि नगर जिल्हे वगळता महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता जाणवते. नाशिक, नगर जिल्ह्यांत मात्र मासिक सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता दीर्घपल्ल्याच्या अंदाजातील स्थितीनुसार जाणवते. अर्थात, १ सप्टेंबर रोजी दिल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या मासिक अंदाजात यात अधिक स्पष्टता जाणवेल.

महाराष्ट्रातील पावसाची स्थिती

पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः शनिवार, रविवारी पावसाचा जोर अधिक असू शकतो. आतापर्यंत ओढ दिलेल्या पर्जन्यछायेतील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा असेल.

पुढील तीन दिवसांत जिल्हावार पावसाची तीव्रता

अति जोरदार : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

जोरदार : नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा.

मध्यम ते जोरदार : सांगली, सोलापूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, वाशीम.

श्रावणी सोमवारपासून सध्या तरी कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पूर्ण नव्हे, पण काहीसा पावसाचा जोर कमी होऊन केवळ श्रावण सरींचा अनुभव जाणवेल.

माणिकराव खुळे, ९४२२०५९०६२

(ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com