
August Rain: ऑगस्ट महिन्यातील पावसाने चांगलीच चिंता वाढवली. तीन आठवडे होत आले तरी अनेक राज्यांमध्ये पाऊस (Maharashtra Rain) नाही. असंच राहीलं तर यंदाचा ऑगस्ट गेल्या १२२ वर्षांतील सर्वात कमी पावसाचा म्हणजेच कोरडा (Dried August) खरू शकतो, असं हवामान विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. पण हवामान विभागाने राज्यासह अनेक भागांंमध्ये आजपासून पावसाचा अंदाज व्यक्त केला.
ऑगस्ट महिन्यात पावसाने बहुतांशी राज्यांमध्ये उघडीप दिली. राज्याच्या जवळपास ७०० ते ८०० मंडळांमध्ये १५ ते १६ दिवसांपासून पाऊस नाही. महाष्ट्रात १ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या काळात सरासरीपेक्षा ६८ टक्के कमी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर शेजारच्या राज्यांमध्येही कमी पाऊस आहे. कर्नाटकात सरासरीपेक्षा ७८ टक्के कमी पाऊस झाला. तेलंगणातही पावसाची तूट ८२ टक्के आहे. गुजरातमध्ये सरारीपेक्षा ९० टक्के कमी पाऊस आहे.
दक्षिणेत केरळमध्ये ९१ टक्के आणि आंध्र प्रदेशात ६० टक्के तूट आहे. राजस्थानमध्येही सरासरीपेक्षा ८९ टक्के पाऊस झाला. पंजाबमध्येही ६४ टक्के आणि हरियानात ६५ टक्के पाऊस पडला. या सर्व राज्यांमध्ये पाऊस नसल्यात जमा आहे. याशिवाय मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस झाला. छत्तीसगडमध्ये २७ टक्के आणि उत्तर प्रदेशात ३२ टक्क्यांनी पाऊसमान कमी आहे. ही सर्व राज्ये खरिपाच्यादृष्टीने महत्वाची आहेत. नेमकं याच राज्यांमध्ये पावासने मोठा ताण दिला.
ऑगस्ट महिन्यात पाऊसमान कमी असल्यामुळे कमी पावसाचा रिकाॅर्ड मोडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती सध्या वाऱ्यासारखी पसरत आहे. या अधिकाऱ्यांच्या मते, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा विचार करता, यंदा १९०१ नंतर ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच यंदाच्या ऑगस्टमध्ये १२२ वर्षांमधील सर्वात कमी पाऊस राहू शकतो. यामुळे खरिपाच्या पिकांवर परिणाम होऊ शकते, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे हवामान विभागाने देशाच्या अनेक भागांमध्ये आजपासून पाऊस सुरु होण्याची शक्यता व्यक्त केला. राज्याच्या विदर्भ आणि मराठवड्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही दिला. तसेच राज्यात इतरही भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.