Maharashtra Rain Update : जून, जुलैमध्ये राज्यात १४ टक्के अधिक पाऊस

Maharashtra Monsoon Update : जूनमधील दडीनंतर जुलैमध्ये मॉन्सूनचा पाऊस सर्वदूर पोहोचला. त्यामुळे राज्यात पावसाने दोन्ही महिन्यांतील सरासरी ओलांडली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ६०६.३ मिलिमीटर म्हणजेच १४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : जूनमधील दडीनंतर जुलैमध्ये मॉन्सूनचा पाऊस सर्वदूर पोहोचला. त्यामुळे राज्यात पावसाने दोन्ही महिन्यांतील सरासरी ओलांडली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ६०६.३ मिलिमीटर म्हणजेच १४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भात समाधानकारक पाऊस झाला. तर पश्‍चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचे वितरण असमान असल्याने अनेक ठिकाणी पावसाने कशीबशी सरासरी गाठली.

यंदा मॉन्सूनचे आगमन लांबले, यातच मॉन्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने जून महिन्यात राज्यात ११३.४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ५४ टक्के पाऊस पडला होता. पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या. जुलैमध्ये राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली.

कोकण, विदर्भात नद्यांना पूर आला. घाटमाथा वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. घाटमाथ्यावरील पावसाने धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. निवडक धरणांतून पाण्याचा विसर्ग झाला असला तरी मोठ्या धरणे भरण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे.

Rain Update
Monsoon Rain : ...अखेर पावसाने राज्याला भिजवले

जुलैमध्ये राज्यात सातत्याने कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरूच असल्याने खरिपाचा पेरा वाढला. विभागनिहाय पावसाची स्थिती पाहता गेल्या काही वर्षांत यंदा पावसाचे प्रमाण कमीच आहे. यंदा कोकण आणि गोवा विभागात सर्वाधिक ३३ टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात १० टक्के अधिक, तर मराठवाड्यात ९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १ टक्का कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

जुलै अखेरपर्यंत राज्यातील विभागनिहाय पाऊस

विभाग---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांमध्ये)

कोकण-गोवा---१७५५.०---२३२६.४---अधिक ३३

मध्य महाराष्ट्र---३८७.२---३८१.५---उणे १

मराठवाडा---३०५.१---३३२.२---अधिक ९

विदर्भ---४८४.७---५३१.९---अधिक १०

जालना, सातारा, सांगलीत तूट

जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी विचारात घेता पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगलीसह सातारा जिल्ह्यात यंदा पावसाची तूट दिसून आली. तर जालना जिल्ह्यात पावसाची दडी कायम राहिली. जालना जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत तब्बल ४० टक्के कमी पाऊस झाला. तर सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत उणे ३२, तर सातारा जिल्ह्यात उणे २४ टक्के पाऊस पडला.

Rain Update
Monsoon Rain : यंदाचा जुलै विक्रमी पावसाचा

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक

जूनमधील पावसाच्या खंडानंतर जुलै अखेरपर्यंत राज्यात सर्वदूर कमी अधिक पाऊस झाला. कोकणातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सरासरीपेक्षा ७३ टक्के अधिक पाऊस झाला. त्यापाठोपाठ मुंबई उपनगरात ६६ टक्के अधिक, पालघरमध्ये ६२ टक्के अधिक नोंद झाली आहे. याशिवाय मुंबई शहर, रायगड, सिंधुदुर्ग, यवतमाळ, लातूर जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून दिसून येत आहे.

जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :

सरासरीपेक्षा खूप अधिक (६० टक्क्यांहून अधिक) :

पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, नांदेड.

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :

मुंबई शहर, रायगड, सिंधुदुर्ग, लातूर, यवतमाळ.

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :

रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सरासरीपेक्षा कमी (उणे ५९ ते उणे २० टक्के) :

सातारा, सांगली, जालना पावसासाठी पोषक प्रणालींची निर्मिती

जूनच्या अखेरच्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस जुलैमध्ये कायम राहिला. मॉन्सूनचा आस त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे राहिला.

तसेच जुलैमध्ये एक जमिनीवरील तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन), तर बंगालच्या उपसागरात चार कमी दाबाची क्षेत्र (लो प्रेशर) तयार झाली. या प्रणाली १५ दिवस टिकून राहिल्या.

प्रशांत महासागरातील एल-निनो स्थिती सर्वसाधारण राहिली. तर भारतीय समुद्रातील द्विधृवीयता (इंडियन ओशन डायपोल-आयओडी) सर्वसाधारण मात्र धनावस्थेकडे झुकलेला होता.

मेडियन जुलियन आसोलेशनदेखील पूरक ठरल्याने ढगांची निर्मिती होत चांगला पाऊस झाला. पश्‍चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाच्या पट्ट्याबरोबरच, (ऑफ शोअर ट्रफ) महाराष्ट्राच्या मध्यातून पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र (इस्ट वेस्ट शेअर झोन) पावसासाठी पोषक ठरले.

जुलै अखेरपर्यंत जिल्हानिहाय पाऊस (सरासरीच्या तुलनेत तफावत) :

जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत (टक्क्यांमध्ये)

मुंबई शहर---१२७६.४---१५३३.६---अधिक २०

पालघर---१२९५.६---२०९७.२---अधिक ६२

रायगड---१८३३.१---२६२१.१---अधिक ४३

रत्नागिरी---१९८५.३---२१९४.६---अधिक ११

सिंधुदुर्ग---१९३१.३---२३१३.४---अधिक २०

मुंबई उपनगर---१३९२.८---२३१८.५---अधिक ६६

ठाणे---१४०५.८---२२५२.५---अधिक ६०

नगर---२०७.५---१७९.०---उणे १४

धुळे---२९०.६---२६५.०---उणे ९

जळगाव---३०७.३---३३८.०---अधिक १०

कोल्हापूर---१०२१.१---१०६१.८---अधिक ४

नंदूरबार---४३६.८---४४२.४---अधिक १

नाशिक---४६०.५---५०८.०---अधिक १०

पुणे---४९७.०---५२५.४---अधिक ६

सांगली---२४५.३---१६६.४---उणे ३२

सातारा---४६९.५---३५४.६---उणे २४

सोलापूर---१८७.९---१८८.५---०

छ. संभाजीनगर---२६५.५---२२२.४---उणे १६

बीड---२५२.५---२२९.५---उणे ९

हिंगोली---३९४.१---३२८.०---उणे १७

जालना---२९०.२---१७५.०---उणे ४०

लातूर---३०८.०---३९८.०---अधिक २९

नांदेड---३८४.६---६६५.८---अधिक ७३

धाराशिव---२५२.४---२७२.५---अधिक ८

परभणी---३३६.०---३१६.१---उणे ६

अकोला---३६५.९---३३६.६---उणे ८

अमरावती---४१७.६---३६६.३---उणे १२

भंडारा---५५०.४---६५६.७---अधिक १९

बुलडाणा---३२८.७---३१५.५---उणे ४

चंद्रपूर---५५१.७---६५५.२---अधिक १९

गडचिरोली---६५५.३---७४३.७---अधिक १३

गोंदिया---६२५.१---६२५.३---०

नागपूर---४९१.२---५२५.६---अधिक ७

वर्धा---४४४.३---४६१.०---अधिक ४

वाशीम---४१६.०---४२१.७---अधिक १

यवतमाळ---४३२.६---५९०.९---अधिक ३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com