Rain Prediction : राज्यातील पावसात ऑगस्टअखेर ११ टक्क्यांची तूट

Imd Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमी पाऊस
नकाशासाठी...
निळा रंग : अधिक २० ते अधिक ५९ टक्के पाऊस
हिरवा रंग :  उणे १९ ते अधिक १९ टक्के
लाल रंग :  उणे २० ते  उणे ५९ टक्के
नकाशासाठी... निळा रंग : अधिक २० ते अधिक ५९ टक्के पाऊस हिरवा रंग : उणे १९ ते अधिक १९ टक्के लाल रंग : उणे २० ते उणे ५९ टक्के agrowon

अमोल कुटे

Rain Update : पुणे : जुलै महिन्यातील समाधानकारक पावसानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली. जून आणि ऑगस्ट महिन्यातील कमी पावसामुळे यंदा राज्यात चिंताजनक स्थिती आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यात ७२०.९ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तलेनेत ११ टक्के कमी पाऊसमान झाले आहे. कोकण, विदर्भात पावसाने सरासरी गाठली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.  

जून महिन्यात पूर्वमोसमी पावसाची दडी, मॉन्सूनच्या पावसाचा अभाव यामुळे राज्यात ११३.४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ५४ टक्के पाऊस पडला होता. जून महिन्याच्या पावसात सरासरीपेक्षा ४६ टक्के तूट होती. त्यामुळे पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या. जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कोकण, विदर्भात नद्यांना पूर आले, मात्र घाटमाथा वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. घाटमाथ्यावरील पावसाने धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. जुलैअखेरपर्यंत राज्यात ६०६.३ मिलिमीटर म्हणजेच १४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती.

ऑगस्ट महिन्यात मात्र मॉन्सूनमध्ये खंड पडल्याने पावसाने पुन्हा दडी मारली. अनेक ठिकाणी १५ ते २२ दिवसांपेक्षाही मोठी उघडीप असल्याने पेरणी झालेली पिके करपू लागली आहेत. ऑगस्टमध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात पाऊस अत्यल्प होता. ऑगस्ट अखेरपर्यंत कोकण विभागात सरासरी इतका पाऊस झाला. विदर्भात पावसाने कशीबशी सरासरी गाठली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले.


ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस
विभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारी
कोकण-गोवा---२४९६.७---२६५१.४---६
मध्य महाराष्ट्र---५८८.४---४५३.१---उणे २३
मराठवाडा---४८१.९---३७८.८---उणे २१
विदर्भ---७८१.८---६७६.७---उणे १३


नकाशासाठी...
निळा रंग : अधिक २० ते अधिक ५९ टक्के पाऊस
हिरवा रंग :  उणे १९ ते अधिक १९ टक्के
लाल रंग :  उणे २० ते  उणे ५९ टक्के
Rain Update : ऑगस्टअखेर राज्यात १८ टक्के अधिक पाऊस

जालना, सांगलीत सर्वात कमी पाऊस

जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे राज्यात यंदा कमी पाऊस पडला आहे. कोकणात सरासरीइतका पाऊस झाला असून, राज्यातील १७ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. मुंबई उपनगर, ठाणे आणि नांदेड जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. ऑगस्ट अखेर जालना जिल्ह्यात ४९ टक्क्यांची तूट आहे. तर सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ४६ टक्के कमी पाऊस पडला आहे.  


राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :
मुंबई उपनगर, ठाणे, नांदेड.

सरासरी इतका  (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :
पालघर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

सरासरीपेक्षा कमी (उणे ५९ ते उणे २० टक्के) :

नंदुरबार, धुळे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया.

नकाशासाठी...
निळा रंग : अधिक २० ते अधिक ५९ टक्के पाऊस
हिरवा रंग :  उणे १९ ते अधिक १९ टक्के
लाल रंग :  उणे २० ते  उणे ५९ टक्के
Maharashtra Rain Update : ऑगस्टमध्ये ७० टक्के कमी पाऊस; देशातील तूट ३६ टक्क्यांवर

ऑगस्टमध्ये १२३ वर्षांत
सर्वात कमी पाऊस

यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मॉन्सूनमध्ये मोठा खंड पडला. अपवाद वगळता संपूर्ण महिन्यातील सर्वच दिवस सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. १९०१ पासूनच्या नोंदींचा विचार करता यंदाच्या ऑगस्ट महिन्यात सर्वांत कमी पाऊस पडला आहे. मॉन्सून आस बहुतांश दिवस उत्तरेकडे राहिला. मॉन्सूनचे प्रवाह कमजोर राहिल्याने, तसेच अवघ्या दोन कमी दाब प्रणाली तयार होत, त्या केवळ ९ दिवस सक्रिय राहिल्या.

त्यामुळे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस झाल्याने देशाच्या पावसात सर्वाधिक ३६ टक्क्यांची तूट नोंदली गेली. यापूर्वी २००५ मध्ये ऑगस्ट महिन्यात २५ टक्क्यांची तूट नोंदली गेली होती. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात अवघा ४१ टक्के पाऊस पडला असून, सरासरीच्या तुलनेत पाऊसमानात ५९ टक्क्यांची तूट दिसून आली आहे. पावसाच्या दडीमुळे उन्हाचा चटका वाढल्याने १९०१ पासूनच्या ऑगस्ट महिन्यातील नोंदीनुसार यंदाचा ऑगस्ट सर्वात उष्ण ठरला आहे.  



यंदा मॉन्सूनवर एल-निनोचा प्रभाव दिसून आला असून, देशभरात पाऊस कमी पडला. ऑगस्ट महिन्यात मेडियन ज्युलियन असोलेशन हा घटक पोषक नव्हता, कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव दिसून आला. त्याचबरोबर मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे राहिल्याने २० दिवस मॉन्सून ब्रेक अनुभवायला मिळाला. महाराष्ट्रासह मध्य भारत, वायव्य आणि दक्षिण भारतातही पाऊसमान कमी झाले आहे.  
- डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग



ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती, सरासरीच्या तुलनेत तफावत :
जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत (टक्के)
मुंबई शहर---१७५८.५---१६३२.६---उणे ७
पालघर---१९३८.३---२३१२.७---१९
रायगड---२६८९.७---२९६६.३---१०
रत्नागिरी---२७८३.४---२५८७.३---उणे ७
सिंधुदुर्ग---२६०६.७---२६४१.०---१
मुंबई उपनगर---१९५९.२---२४९५.७---२७
ठाणे---२०८७.१---२५७६.१---२३
नगर---३०८.७---१९७.५---उणे ३६
धुळे---४२८.३---३१२.९---उणे २७
जळगाव---४९९.०---४०७.६---उणे १८
कोल्हापूर---१५००.९---१२५६.२---उणे १६
नंदूरबार---६९१.३---५१५.१---उणे २५
नाशिक---७१५.७---६३०.०---उणे १२
पुणे---७६४.८---६३३.६---उणे १७
सांगली---३५२.८---१९२.०---उणे ४६
सातारा---६८७.०---४३०.५---उणे ३७
सोलापूर---२९२.४---२०२.८---उणे ३१
छ. संभाजीनगर---४१३.६---२६८.३---उणे ३५
बीड---३९१.६---२५१.४---उणे ३६
हिंगोली---६१६.१---३८७.९---उणे ३७
जालना---४५०.६---२२९.२---उणे ४९
लातूर---४९०.३---४२४.७---उणे १३
नांदेड---६२२.०---७४८.५---२०
धाराशिव---४००.४---२९२.०---उणे २७
परभणी---५३६.३--३८१.५---उणे २९
अकोला---५७८.३---३८६.५----उणे ३३
अमरावती---६७८.९---४३०.३---उणे ३७
भंडारा---९११.६---८८४.२---उणे ३
बुलडाणा---५२४.३---३९३.२---उणे २५
चंद्रपूर---९०५.३---८२०.६---उणे २८
गडचिरोली---१०८८.०---१०४२.९---उणे ४
गोंदिया---१०३२.८---८०४.३---उणे २२
नागपूर---७७७.६---६८६.२---उणे १५
वर्धा---६९०.८---५८६.१---उणे १५
वाशीम---६३२.६---५०८.२---उणे २०
यवतमाळ---६७६.६---६९३.८---३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com