Video
Soybean Procurement: राज्यात सोयाबीन खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरु?
Soybean Market: सोयाबीनची खरेदी १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष सुरु होणे अपेक्षित होते. पण मार्केटींग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशनच्या काही केंद्रांवरच खरेदी सुरु झाली. बाजार समित्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रांना मुळात मान्यताच उशीरा मिळाली. या केंद्रांवर नोंदणीच सुरु आहे. खरेदीसाठी बारदाणाच मिळालेला नाही. हा बारदाणा नेमका कधी मिळेल? हेही सांगता येत नाही. कारण बारदाणा पुरवठ्याची निविदा प्रक्रियेत अडकून आहे.
