ऐन सणांच्या काळात ट्रॅक्टर विक्रीत ०.५ टक्के घट आली आहे. यंदाच्या मॉन्सून हंगामात पावसाने दडी मारली होती. परिणामी ४२ दिवसात ट्रॅक्टरची विक्री घटली आहे. सणांच्या काळात देशात ट्रॅक्टरची विक्री वाढत असते. परंतु यंदा मात्र ट्रॅक्टर विक्रीत घट नोंदवली गेली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोशियशनच्या माहितीनुसार २०२२ मध्ये या कालावधीत ८६ हजार ९५१ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. तर २०२३ मध्ये याच कालावधीत ८६ हजार ५७२ ट्रॅक्टरच्या विक्री झाली आहे. मॉन्सूनच्या शेवटी मात्र ट्रॅक्टर विक्रीत काहीशी सुधारणा नोंदवली गेली.
नवरात्रीच्या काळात ट्रॅक्टर विक्रीत ८.३ टक्के घट झाली होती. परंतु शेवटच्या टप्प्यात ग्रामीण भागातून ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाली. शेवटच्या टप्प्यात ट्रॅक्टर विक्रीतील घट ०.५ टक्के नोंदवली गेली. त्यामुळे ट्रॅक्टर उद्योगाला आधार मिळाला, अशी माहिती बिझनेस लाईन या वृत्तपत्राला फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोशियशनचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी दिली.
ट्रॅक्टरच्या देशांतर्गत विक्रीत आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १२.२ टक्के वाढ दिसून आली. कारण मॉन्सूनने चांगला हजेरी लावली होती. तसेच जलशयांमध्ये चांगला पाणी साठा होता. परंतु आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत २ टक्क्यांनी ट्रॅक्टरच्या विक्रीत घट झाली आहे.
देशांतर्गत ट्रॅक्टरच्या मागणीत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तीन ते पाच टक्क्यांची अपेक्षा आहे. केंद्र सरकारकडून कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील वर्षी ट्रॅक्टरची विक्री चांगली राहिली होती. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात वाढ अपेक्षित होती. परंतू देशातील मॉन्सूनच्या असमान वितरणामुळे ट्रॅक्टरच्या मागणीत घट होण्याची चिन्हं आहेत. कारण उत्तर भारतात अनेक ठिकाणी महापूरानं नुकसान केलं तर दक्षिण भारतात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम ट्रॅक्टरच्या मागणीवर होईल. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात ट्रॅक्टरची मागणी घटण्याची शक्यता ट्रॅक्टर उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.