Fish Feed : शोभिवंत माशांसाठी जिवंत खाद्य काय?

ट्युबिफेक्स म्हणजेच स्लज अळी. याचे माशांचे खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणावर संवर्धन केले जाते. ही अळी तलावात, नदीत व सांडपाणी या जागी आढळते. जिवंत खाद्य शोभिवंत माशांचे रंग आणि परिपक्वता वाढवितात. माशांमधील मरतुकीचा दर कमी होतो.
Fish Feed
Fish FeedAgrowon
Published on
Updated on

रुद्राणी विरकपाळे, जयंता टिपले

शोभिवंत मत्स्यपालन (Fisheries) करताना जिवंत खाद्याचा (Fish Feed) उपयोग केल्यास उत्पादन खर्च कमी होतो. रोग प्रतिकारशक्तीमध्ये वाढ झाल्यामुळे माशांना होणाऱ्या रोगाचे प्रमाण कमी होते.

माशांच्या (Fish) जीवनक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यात योग्य जिवंत खाद्य उपलब्ध करून दिल्यास माशांची जास्तीत जास्त वाढ होते. जिवंत खाद्य माशांद्वारे सहज टिपले जाते. जिवंत खाद्य तयार करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे.

जिवंत खाद्य शोभिवंत माशांचे रंग (कलर पिगमेंटेशन) आणि माशांची परिपक्वता वाढवितात. माशांमधील मरतुकीचा दर कमी होतो. जगणुकीचे प्रमाण आणि सर्वांगीण गुणवत्ता वाढते.

जिवंत खाद्याचे महत्त्व ः

१) जिवंत खाद्य म्हणजे सहज पचण्याजोगा प्रथिनयुक्त आहार आहे.

२) जिवंत खाद्यातून शोभिवंत माशांना विविध टप्प्यांसाठी आवश्यक जीवनसत्वे, अमिनो ॲसिड आणि खनिजे यासारखी सर्व पोषक तत्त्वे मिळतात.

Fish Feed
Fish Farming : मत्स्य संवर्धनामधील समस्या सोडवण्यासाठी हे उपाय करा

३) शोभिवंत मत्स्यपालनाचे यश जिवंत खाद्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते, कारण त्याचा परिणाम मत्स्यबीज संगोपन तसेच प्रजननासाठी म्हणजेच प्रजननक्षम माशांना उत्तेजित करण्यासाठी होत असतो.

४) चांगले उत्पादन मिळण्यासाठी सर्व माशांना योग्य प्रकारचा पुरेसा आहार दिला पाहिजे. माशांना खाद्य हे त्यांच्या आवडीनुसार व आकारानुसार दिले पाहिजे. खाद्याद्वारे माशांना आवश्यक प्रथिने, चरबी व कर्बोदके मिळतात.

५) विविध जीवन खाद्यपदार्थ जसे की इन्फ्युसोरिया, आरटीमिया, ट्युबिफेक्स व इत्यादी खाद्यपदार्थ माशांना दिले जाते. या खाद्यपदार्थांपैकी ट्युबिफेक्स सर्वाधिक माशांचे आवडते जिवंत खाद्य आहे.

ट्युबिफेक्सची ओळख ः

१) ट्युबिफेक्स म्हणजेच स्लज अळी. याचे माशांचे खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणावर संवर्धन केले जाते. ही अळी तलावात, नदीत व सांडपाणी या जागी आढळते.

२) ट्युबिफेक्स हे एक सूक्ष्म, लालसर अळी असून २ सेंमी लांब वाढते. त्यांचे पुढचे टोक चिखलात बुडलेले असते. त्यांचे मागचे टोक चिखलाच्या वरच्या दिशेने प्रक्षेपित होत असते. ज्याद्वारे अन्न आणि श्वास घेतात.

३) ट्युबिफेक्स मध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन व अमायनो ॲसिड असतात. ज्याच्यामुळे माशांची वाढ लवकरात लवकर होते.

४) शोभिवंत माशांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात ट्युबिफेक्स उत्तम खाद्यपदार्थ ठरते.

Fish Feed
Fish Farming : मत्स्यशेतीसाठी कोणत्या माश्यांची निवड करावी?

उत्पादनासाठी आवश्यक साहित्य:

१) २० सेंमी रुंद आणि २०० सेंमी लांबीचा ट्रे, तलावातील माती, प्लॅस्टिकची बादली, कुजलेला भाजीपाला, कुदळ, कोंडा, पाण्याची टाकी, ट्युबिफेकस इनोकुलम.

ट्युबिफेक्सचे संवर्धन ः

१) या प्रक्रियेसाठी एक ट्रे घ्यावा. त्यामध्ये तलावातील माती पसरावी. पुन्हा त्यामध्ये कुजलेला भाजीपाला, कोंडा टाकून त्याचे मिश्रण तयार करावे. त्यामुळे ट्युबिफेक्सच्या प्रजननास योग्य असे वातावरण मिळते.

२) या प्रक्रियेमध्ये सतत पाण्याचा हळुवार प्रवाह चालू ठेवावा, त्यामुळे संवर्धनास ओलावा टिकून राहील.

३) १५ दिवसात ट्युबिफेक्स अळीचे अनेक गट (क्लस्टर) तयार झालेले दिसतील. पुन्हा हे गट (क्लस्टर) कुदळीच्या साहाय्याने काढले जातात. एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले जातात.जेव्हा

ऑक्सिजनची कमतरता भासते तेव्हा ते स्वतःहून पृष्ठभागावर येतात. तेव्हा त्यांना जमा करावे. पाण्याच्या प्रवाहाखाली स्वच्छ धुवावे. ज्यामुळे त्यांच्या शरीराला चिकटलेला चिखल निघून जातो. ते माशांना अन्न म्हणून पुरवण्यास योग्य ठरतात.

संपर्क ः जयंता टिपले, ८७९३४७२९९४, (सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com