Fish Farming : मत्स्यशेतीसाठी कोणत्या माश्यांची निवड करावी?

नैसर्गिक अन्नाचा कार्यक्षम वापर करण्यास सक्षम असावी. उच्च प्रजनन क्षमता असावी आणि बंदिस्त वातावरणामध्ये पुनरुत्पादन करणे सोपे असावे.
Fish Farming
Fish FarmingAgrowon
Published on
Updated on

गणेश दिगंबर पाटील, जयंता टिपले

मत्स्यपालनसाठी (Fish Farming) निवडलेल्या प्रजातींमध्ये (Fish Breed) काही आवश्यक गुण असावेत. जलद वाढीचा दर, अल्पावधीत मोठ्या आकारात वाढणाऱ्या मत्स्य जाती महत्त्वाच्या आहेत. जेव्हा एखादी प्रजाती मत्स्यपालनासाठी (Fisheries) निवडली जाते. तेव्हा ग्राहकांची पसंती लक्षात घेणे आवश्यक आहे.

उदा. सिल्व्हर कार्प (जास्त काटे असल्याने मागणी नाही). लहान खाद्य साखळी असलेले मासे निवडावेत. डेट्रिटस, प्लँक्टन किंवा वनस्पतींवर अन्नावर अवलंबून असणारे मासे अतिरिक्त फायदेशीर असतात. कृत्रिम आहार ग्रहण करणारे मासे निवडावेत.

उच्च उत्पादन (Fish Production) दर मिळविण्यासाठी, कृत्रिम खाद्य (Fish Feed) स्वीकारणाऱ्या माशांचे संगोपन करणे आवश्यक आहे. जेणे करून जास्तीत जास्त फायदा होईल. वातावरणातील अचानक बदल (Climate Change) सहन करण्यास सक्षम असावी.

नैसर्गिक अन्नाचा कार्यक्षम वापर करण्यास सक्षम असावी. उच्च प्रजनन क्षमता असावी आणि बंदिस्त वातावरणामध्ये पुनरुत्पादन करणे सोपे असावे. मत्स्यपालन करताना तापमान, सामू, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असावे.

पाण्याच्या भौतिक, रासायनिक परिस्थितीतील चढ उतारांना अनुकूल प्रतिसाद दिला पाहिजे. रोग आणि परजीवींना प्रतिकारशक्ती चांगली असावी. इतर प्रजातींना त्रास न देता एकत्र राहण्याची गुणवत्ता विशेषतः पॉलिकल्चरमध्ये निवडलेल्या माशांमध्ये आवश्यक आहे. मांसाहारी माशांचे स्वतंत्रपणे संवर्धन करावे.

Fish Farming
Fish Breeding Technology : एंजल माशाचे प्रजनन तंत्रज्ञान

भारतात गोड्या पाण्यातील मत्स्यपालन आणि खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते. गोड्या पाण्यातील मत्स्यपालनामध्ये कार्प (आयमसी आणि सीमसी), कॅटफिश, गोड्या पाण्यातील कोळंबी इत्यादीचा समावेश केला जातो. मिश्रकल्चरमध्ये कटला, रोहू, मृगळ संवर्धन केले, तर तलावाचा परिपूर्ण फायदा होतो.

आशियामध्ये कार्प कल्चरच्या दोन प्रमुख प्रणाली आहेत: चायनीज पॉलिकल्चर सिस्टम जेथे चिनी कार्प एकत्रितपणे संवर्धन केले जाते आणि भारतीय संमिश्र मत्स्यपालन प्रणाली जेथे भारतीय प्रमुख कार्प आणि चिनी कार्प एकत्र कल्चर केले जातात.

चीनमध्ये, सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प, मड कार्प, ब्लॅक कार्प आणि कॉमन कार्प तलावांमध्ये पॉलिकल्चर प्रणाली अंतर्गत संवर्धन करतात.

पाण्याचा निचरा न करता येणाऱ्या तलावांमध्ये संमिश्र मत्स्यसंवर्धनाच्या भारतीय प्रणाली अंतर्गत भारतीय कार्प, उदा. कटला, रोहू आणि मृगळ आणि चिनी कार्प्स, उदा. सिल्व्हर कार्प आणि ग्रास कार्प आणि कॉमन कार्प या माशांचे संवर्धन करतात. याचबरोबरीने मरळ, पंगस आणि गोड्या पाण्यातील कोळंबी या प्रजातीचे सुद्धा तलावात संवर्धन करतात.

संवर्धन योग्य माशांच्या प्रजाती

कटला ः

- ही सर्वांत वेगाने वाढणारी भारतीय प्रमुख कार्प प्रजाती आहे. ही प्रजाती पाण्याच्या पृष्ठभागाच्या थरात वास्तव्य करते. प्लँक्टनवर (प्लवंग) खाद्यासाठी अवलंबून असते.

- तलावातील संमिश्र मत्स्यपालनांतर्गत ही प्रजाती साधारणपणे एका वर्षात एक किलोपेक्षा जास्त वाढते.

रोहू ः

- मागणी असलेली ही प्रजाती आहे. मुख्यतः उच्च वनस्पती, डेट्रिटस वर हा मासा वाढतो. तलावाच्या संवर्धनाच्या परिस्थितीत एका वर्षात ९०० ग्रॅमपर्यंत वाढते.

मृगळ ः

- हा मासा तलावाच्या तळाशी वास्तव्य करतो. तलावाच्या संवर्धनाच्या परिस्थितीत हा एका वर्षात एक किलोपेक्षा जास्त वाढतो.

सिल्व्हर कॉर्प ः

हा मासा तलावाच्या पृष्ठभागावर राहतो. सुरुवातीच्या काळात झूप्लँक्टनवर जगतो. हळूहळू प्रामुख्याने फायटोप्लँक्टन खातो. तलावाच्या संवर्धन प्रणालीमध्ये हा मासा पेंड आणि तांदळाच्या कोंडा मिश्रणासारखे पूरक खाद्य सहजतेने स्वीकारतो.

ग्रास कॉर्प ः

मोठ्या प्रमाणात संवर्धन केले जाते. नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये जैविक तण नियंत्रणासाठी ग्रास कार्पचा वापर केला जातो. आहाराच्या प्रमाणावर वाढ प्रामुख्याने अवलंबून असते.

आहार दरानुसार हा एका वर्षात ५ किलोपेक्षा जास्त वाढू शकते. संमिश्र मत्स्यपालन तलावांमध्ये हा साधारणपणे १.५ किलोपेक्षा जास्त वाढतो.

Fish Farming
Fish Market : मासळीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल

कॉमन कॉर्प ः

-अन्नाच्या शोधात हा मासा वारंवार तलावाच्या तळाशी जातो.

- वाढ प्रामुख्याने साठवण घनता आणि पूरक खाद्याचा दर यावर अवलंबून असते. संमिश्र मत्स्यपालन तलावांमध्ये एका वर्षात सुमारे एक किलोपर्यंत वाढतो.

तिलापिया ः

- मत्स्यपालनासाठी हा अतिशय फायदेशीर मासा आहे

- उच्च प्रथिनांचे प्रमाण, मोठा आकार, जलद वाढीचा दर असल्याने या माशाचे संवर्धन फायदेशीर ठरते.

संपर्क ः जयंता टिपले, ८७९३४७२९९४ (सहायक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com