डॉ. आदिनाथ ताकटे, ऐश्वर्या राठोड
Good Quality Water for Irrigation : शेतात सिंचनासाठी वापरावयाच्या पाण्याची प्रत ही त्यामध्ये असणाऱ्या विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सामू, सोडिअमचे अधिशोषित गुणोत्तर, अवशेषात्मक सोडिअम कार्बोनेट, क्लोराइड्स, बोरॉन, नायट्रेट नायट्रोजन इ. रासायनिक गुणधर्मावर अवलंबून असते.
सिंचनाच्या पाण्यामध्ये विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यास पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. शिवाय जमिनीचे आरोग्यदेखील चांगले राहत नाही. त्यामुळे चांगल्या प्रतीचे पाणी सिंचनासाठी वापरणे आवश्यक आहे.
पाण्याच्या पृथक्करणासाठी अर्धा लिटर पाणी नमुना पुरेसा होतो. पाण्याचा नमुना स्वच्छ प्लॅस्टिक किंवा काचेच्या बाटलीत घ्यावा.
पाण्याचा नमुना घेताना विहिरीच्या मध्य भागातील पाणी बादलीच्या साह्याने ढवळून काही बादल्या पाणी बाहेर उपसून टाकल्यानंतर पाण्याचा नमुना घ्यावा. कूपनलिकेतील पाणी घेताना १० ते २० मिनिटे एकसारखी कूपनलिका चालवून नंतर स्वच्छ प्लॅस्टिक किंवा काचेच्या बाटलीत पाणी नमुना घ्यावा.
नदी, ओढे, कालवा यांच्यामधील पाण्याचा नमुना घेताना वाहत्या पाण्यामधून मध्य भागातील नमुना घ्यावा.
नमुना भरण्यापूर्वी बाटली त्या पाण्याने दोन ते तीन वेळा विसळून घ्यावी. घट्ट बूच बसवून २४ तासांच्या आत प्रयोगशाळेत पृथक्करणासाठी नमुना पाठवावा.
बाटलीसोबत शेतकऱ्याचे नाव व नमुना कशातून घेतला याबाबतची सविस्तर माहिती लिहिलेले लेबल बाटलीवर लावावे.
पाण्याचा प्रातिनिधिक नमुना घेतल्यानंतर पृथक्करण अहवालानुसार सामू (आम्ल विम्ल निर्देशांक) सर्वसाधारण किंवा विम्लधर्मी आहे कळते.
पाण्याचा सामू (आम्ल विम्ल निर्देशांक)
सामू प्रत शिफारस
६.५ ते ८ चांगली (सर्वसाधारण) सर्व जमिनीस, पिकांना उपयुक्त.
८ पेक्षा जास्त विम्लधर्मी पिकास अयोग्य, परंतु असे पाणी वापरावयाचे असल्यास क्षारांस प्रतिकार करणाऱ्या पिकांची निवड करावी उदा. ऊस, कापूस, गहू, बीट, कांदा इ.
पाण्याच्या पृथक्करण अहवालानुसार त्यामध्ये असणाऱ्या सोडियम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराइड्स, सल्फेट, बोरॉन व नायट्रेट नायट्रोजन यांचे एकमेकांशी असलेले प्रमाण तसेच विद्युत वाहकता, सोडिअमचे अधिशोषित गुणोत्तर, अवशेषात्मक सोडिअम कार्बोनेट आदींच्या प्रमाणावर पाण्याची प्रत ठरविली जाते.
शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची प्रत
पाण्याची प्रत/ वर्गीकरण विद्युत वाहकता (डेसिसायमन प्रतिमीटर) सोडिअमचे अतिशोषित गुणोत्तर रेसिक्युअस सोडिअम कार्बोनेट (मि.इ/लि) सोडिअम
(टक्के) बोरॉन
(पीपीएम) क्लोराइड
(मि.इ/लि) पाण्याचा
उपयोग
खूप चांगली वर्ग-१ ०.२५ पेक्षा कमी १० पेक्षा कमी १.२५ पेक्षा कमी ५० पेक्षा कमी १ पेक्षा कमी ५ पेक्षा कमी सर्व जमिनी आणि पिकांसाठी.
चांगली
वर्ग-२ ०.२५-०.७५ १०-१८ १.२५ पेक्षा कमी ५०-६५ १-२ ५-१० जास्त रेती, वाळू असणाऱ्या जमिनीसाठी सुरक्षित. मध्यम ते चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी उपयुक्त. मध्यम ते जास्त क्षार प्रतिकार करणारी पिके घ्यावीत.
शंकास्पद वर्ग-३ ०.७५- २.२५ १८-२६ १.७५-२.२५ ६५-९२ २-३ १०-१५ जमिनीत योग्य अंतरावर चर खोदावेत. सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा. क्षारास प्रतिकार करणारी पिके घ्यावीत.
अयोग्य
वर्ग-४ २.२५ पेक्षा जास्त २६ पेक्षा जास्त २.२५ पेक्षा जास्त ९२ पेक्षा जास्त ३ पेक्षा जास्त १५ पेक्षा जास्त सर्वसाधारण पिकांसाठी उपयुक्त नाही.
डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.