Sugarcane: कांडीकोळसा बनविण्यासाठी ऊस पाचटाचा वापर

पुणे येथील अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूट (आरती) संस्थेने उसाच्या पाचटापासून कांडीकोळसा तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
Sugarcane Trash
Sugarcane TrashAgrowon

टाकाऊ शेतमालाचे कोळशात रूपांतर केल्यास तो विक्री योग्य इंधनाचा एक प्रकार होतो. कोळसा (Coal) करण्याची पद्धत फार सोपी असते. जैवभार जर तापवला तर त्याचे विघटन होऊन त्यातून सुमारे ७० टक्के ज्वलनशील पदार्थ वायुरूपाने बाहेर पडतात. हा वायू बाहेर पडल्यानंतर जैवभाराचा जो अवशेष  भट्टीत शिल्लक राहतो तो कोळसा असतो. पुणे येथील अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूट (आरती) (Arti) संस्थेने उसाच्या पाचटापासून (Sugarcane Trash) कांडीकोळसा तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे.  हा कांडीकोळसा शुद्ध कार्बन स्वरुपाचा असल्यामुळे तो जळताना धूर निघत नाही व भांड्याच्या बुडाला काजळीही धरत नाही. 

Sugarcane Trash
तंत्र कोळसा उत्पादनाचे...

कांडीकोळसा तयार करण्याची पद्धत  

- कांडी कोळसा तयार करण्यासाठी एक नविन प्रकारची भट्टी विकसित करण्यात आली आहे. आकाराने छोटी सुटसुटीत व सहजपणे वाहतूक करता येईल अशी ही भट्टी पत्र्याच्या दोनशे लिटरच्या पिंपापासून तयार केलेली आहे. 

- तयार झालेला कोळसा साठविण्यासाठी आणखी एक पिंप असतो. भट्टीची उंची १४० सेमी असून या भट्टीला खालच्या बाजूला १३  छिद्र तर कडेला १२ छिद्र पाडलेले असतात. 

- भट्टीमध्ये उसाचे पाचट किंवा पालापाचोळा ७ किलो, तुराट्या, पराट्या १० ते १२ किलो, तर कागदपुठ्ठे ५ किलो मावतात. भट्टीमध्ये भरलेल्या पदार्थांचा १५ ते २० मिनिटात कोळसा तयार होतो. योग्य वेळी थांबून भट्टीचे झाकण उघडावे लागते. 

Sugarcane Trash
Soybean Rate : सोयाबीन दर सुधारतील का?

- पालापाचोळा किंवा पाचटाच्या भुकटीच्या स्वरूपात कोळसा होतो  तूर काड्या, तुराट्या, पराट्या, बांबू लाकडाचे तुकडे असे पदार्थ असल्यास ज्या आकाराचा पदार्थ असेल त्या आकाराचाच कोळसा तयार होतो. 

- अशा प्रकारे तयार झालेला कोळसा दुसऱ्या लोखंडी बॅरलमध्ये भरून बॅरलला घट्ट झाकण लावावे. कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर एकावेळी ५ ते ६ भट्ट्या पेटवून मोठ्या प्रमाणात कोळसा तयार होतो.

- हा कोळसा जमिनीवर पसरून त्यावरून जर एखादा रूळ अगर मोठा सिमेंट पाईप फिरवला तर या कोळशाचा बारीक भुगा होतो. त्यात थोडे शेण किंवा खळ मिसळून  त्याचे सुमारे ४ सेंमी  व्यासाचे इंधन गोळे हाताने वळता येतात किंवा एक्स्ट्रुडर चा अगर साच्याच्या साह्याने त्याचा कांडी कोळसा किंवा इंधन विटा बनविता येतात. 

Sugarcane Trash
Cotton Rate : पूर्वहंगामी कापूस पिकात दोनच वेचण्या होणार

कोळशाच्या शेगडीत कांडीकोळशाचा वापर

- सध्या कोळशाच्या शेगडीत सुद्धा हे इंधन चांगल्या प्रकारे जळते. लोहार कामासाठी सुद्धा हा कोळसा वापरता येतो. कोळसा शुद्ध कार्बन स्वरूपाचा असल्याने जळताना त्यातून धूर निघत नाही. भांड्याच्या बुडाला काजळी ही धरत नाही.  

- उसाचे पाचट हा या प्रक्रियेसाठी अत्यंत योग्य असा त्याज्य पदार्थ आहे. ऊस शेतीत सर्वसाधारणतः प्रति हेक्टर १० टन पाचट निर्माण होते. पण त्याचा शेतकऱ्याला काहीच उपयोग नसल्याने उसाची तोडणी झाली की पाचट शेतावरच जाळून टाकले जाते. 

- या भट्टीचा वापर करून पाचटापासून रोज सुमारे १०० किलो कोळसा निर्माण करणे शक्य होते आणि तयार कोळसा प्रति किलो ७ ते १० या भावाने विकला जातो. 

- भट्टीत जाळण्यासाठी लागणारा जैवभार हिशोबात धरल्यास एकूण जैवभाराच्या  सुमारे ३० टक्के इतका कोळसा वरील प्रक्रियेने मिळतो.

सराई कुकर व शेगडी जोड प्रणाली 

- या कांडी कोळशाचा रास्त उपयोग व्हावा म्हणून आरती संस्थेने सराई कुकर व शेगडी अशी एक जोड प्रणाली विकसित केली आहे. 

- या कुकर व शेगडी प्रणालीमध्ये सुमारे १०० ते १२५ ग्रॅम कांडीकोळसा वापरून सुमारे पाच व्यक्तींना पुरेल एवढी डाळ, भात व भाजी असे तीन पदार्थ एकाच वेळी शिजू शकतात.

- एकदा कोळसे पेटले की कुकरकडे पाहावेच लागत नाही. कोळसा विझल्यानंतरच कुकर उघडायचा तोवर सर्व पदार्थ शिजतात. कुकर लावून इतर कामे करता येतात. 

- शेगडी पासून कुकर वेगळा केला की शेगडीवर तवा ठेवून त्यावर चपाती, भाकरी भाजणे किंवा कढई ठेवून त्यात काही तळणे अशी कामे करता येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com