Pest Management : उन्हाळ्यातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

Integrated Pest Management : एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा वापर केला जातो. त्या माध्यमातून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते.
Integrated Pest Management
Integrated Pest ManagementAgrowon

प्रा. अमोल ढोरमारे, डॉ. संदीप मोरे

Pest Management System : एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा वापर केला जातो. त्या माध्यमातून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भर दिला जातो. त्यासाठी लेबलक्लेम असलेल्या कीडनाशकांचा कमी वापर केला जातो. त्यामुळे पीक उत्पादनामध्ये कीटकनाशकांचे अंश राहत नाहीत.

एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मशागतीय, भौतिक, रासायनिक, जैविक पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातील मशागतीय पद्धतीमध्ये कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रणासाठी उपाय करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या पद्धतीचा अवलंब केला जातो. मशागतीय कीड नियंत्रण पद्धतीचा वापर गावपातळीवर सामुदायिकरीत्या केला तर पिकांवर येणाऱ्या किडींचे प्रभावी आणि कमी खर्चात व्यवस्थापन होऊ शकते.

शेतजमिनीची खोल नांगरट

एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रामध्ये उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उन्हाळी नांगरटीमुळे जमिनीत साधारण १० सेंमीपर्यंत सुप्तावस्थेत गेलेल्या किडीच्या अवस्था खोल नांगरणीमुळे उघड्या पडतात. त्यांना पक्ष्यांद्वारे खाल्ले जाते किंवा प्रखर सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात. उदा.

घाटे अळीची कोष, टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळीची कोष, टरबुज व खरबूज पिकातील फळमाशीची देखील कोष अवस्था जमिनीची नांगरणीने नष्ट होते. गोगलगायींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असलेल्या शेतात खोलवर नांगरणी केल्याने नुकसान कमी होते.

Integrated Pest Management
Integrated Pest-Disease Management : एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन पद्धत काळाची गरज

सीताफळात पिठ्या ढेकूण किडींची मादी मे-जून महिन्यांत ३०० ते ४०० अंडी अंडीपुजांमध्ये जमिनीत झाडाभोवती घालते. उन्हाळ्यात खोलवर नांगरणी केल्यास अंडी अवस्था उघड्यावर येऊन प्रादुर्भावदेखील कमी होऊ शकतो.

मोसंबी बागेतील गुळवेल व वासनवेल या वनस्पती मुळासकट नष्ट कराव्यात. कारण रस शोषणाऱ्या पतंगाची अळी अवस्था यजमान पीक म्हणून ही या वनस्पतीवर राहते. हळद लागवडीपूर्वी शेताची खोलवर नांगरणी करून कमीत कमी ३० दिवसांपर्यंत सूर्यप्रकाशाच्या साह्याने मातीचे निर्जंतुकीकरण करावे. त्यामुळे सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

Integrated Pest Management
Tur Pest Management : तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन

उन्हाळ्यात कुजलेल्या शेणखताचा वापर करताना, मेटाऱ्हायझिम ॲनिसोप्ली ही जैविक बुरशी १ किलो प्रति टन शेणखतात मिसळावे. म्हणजे मातीतील किडींपासून पिकांना संरक्षण मिळेल. उदा. हुमणी अळी, रोप कुरतडणारी अळी इ.

शेतातील पिकांचे अवशेष नष्ट करावेत. जसे की कापूस पिकामध्ये जमिनीवर पडलेल्या बोंडामधील सरकीमध्ये गुलाबी बोंड अळी सुप्तवस्थेत जाते. त्यामुळे ते गोळा करून नष्ट करणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात (मे किंवा जून महिन्यांत) शेतात विजेचा बल्ब लावून त्याखाली एका टबमध्ये रॉकेलमिश्रित पाणी किंवा कीटकनाशक मिश्रित पाणी ठेवल्यास पतंग, भुंगे इ. आकर्षित होऊन पाण्यात पडून मरतात. उदा. हुमणीचे प्रौढ भुंगेरे, विविध किडीचे पतंग.

उन्हाळ्यात जिनिंग परिसरात गुलाबी बोंड अळीसाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. जेणेकरून त्यात पतंग अडकतील आणि प्रादुर्भाव कमी होईल.

ऊस शेतातील तसेच बांधावर असलेली वाळवीची वारुळे खोदून वाळवीच्या राणीसह नष्ट करावीत. जेणेकरून उसामध्ये वाळवीचा होणारा प्रादुर्भाव टाळला जाईल.

विविध पिकांतील सूत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरिता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा पावडर २ किलो प्रति २५० किलो कुजलेले शेणखत प्रति एकर प्रमाणामध्ये मिसळून वापर करावा.

- प्रा.अमोल ढोरमारे, ९६०४८३३७१५

- डॉ. संदीप मोरे, ९६७५००६०७०

(कृषी कीटकशास्त्र विभाग, सौ. के. एस. के (काकु) कृषी महाविद्यालय, बीड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com