Integrated Pest-Disease Management : एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन पद्धत काळाची गरज

Agricultural Expert Vitthal Chavan : बदलत्या वातावरणामुळे पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन करावे.
Agricultural Expert Vitthal Chavan
Agricultural Expert Vitthal ChavanAgrowon

Sangli News : बदलत्या वातावरणामुळे पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन करावे. कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धत महत्त्वाची आहे. त्यासाठी शेतीच्या मशागतीपासून त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे, असे मत कृषी तज्ज्ञ (कीड-रोग व खत व्यवस्थापन) विठ्ठल चव्हाण यांनी व्यक्त केले.

Agricultural Expert Vitthal Chavan
Pest Disease Management : मोबाइल ॲपद्वारे पिकांवरील कीड-रोगांची होणार ओळख

मालगाव (ता. मिरज) येथे ‘अॅग्रोवन’च्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. २०) अॅग्रोवन व ‘क्रॉप्लॅन बायोसायन्सेस प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भाजीपाला पिकातील एकात्मिक कीड व रोग, खत व्यवस्थापन’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी क्रॉप्लॅन बायोसायन्सेस प्रा. लि.चे विभागीय व्यवस्थापक अजयसिंह शिसोदे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, की एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन करण्यासाठी भौतिक, यांत्रिक, मशागती आणि सापळा अशा चार पद्धती आहेत. या पद्धतीचा शेतकरी वापर करतो. त्यामध्ये कामगंध सापळ्याची महत्त्वाची भूमिका आहे. कामगंध सापळा कोणती कीड येणार आहे याची माहिती देतो. त्यानुसार शेतकऱ्यांची त्याचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. हानीकारण कीडींचे नर पतंग पकडण्यासाठी लावणे कामगंध सापळे योग्य वेळी योग्य प्रमाण शेतात लावणे आवश्यक आहे. त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती फायदेशीर ठरते.

Agricultural Expert Vitthal Chavan
Chana Pest Management : हरभरा पिकातील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

अजयसिंह शिसोदे म्हणाले, की क्रॉप्लॅन बायोसायन्सेस कंपनीची स्थापना २०१० मध्ये झाली आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांत ही कंपनी काम करत आहे. कंपनीने उत्पादित केलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापनासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

मिलिंद निंबाळकर म्हणाले, की शेती करताना कोणत्या पिकाला किती खर्च येतो, किती उत्पन्न मिळते याचा ताळेबंद करून कमी खर्चा अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे. प्रास्ताविक ‘अॅग्रोवन’चे प्रतिनिधी अभिजित डाके यांनी केले. तर सांगलीचे वितरण प्रतिनिधी दत्ता कोळी यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com