BBF Seeder: बीबीएफ यंत्राने पेरणी

Agriculture Technology: ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राने रुंद वरंबा व सरी पद्धतीने पेरणी केल्यास १५-३०% उत्पादन वाढ, जलसंधारण आणि अतीपावसात पीक संरक्षण होतो.
BBF
BBFAgrowon
Published on
Updated on

Mechanized Sowing: बीबीएफ यंत्र ट्रॅक्टरचलित आहे. यंत्राच्या साह्याने विविध पिकांची टोकण पद्धतीने वरंब्यावर पेरणी करावी. या पद्धतीमुळे जास्त पाऊस पडला तर अतिरिक्त झालेले पाणी रुंद वरंब्यातून सरीद्वारे शेतातून बाहेर निघून जाते. योग्य किंवा कमी प्रमाणात पाऊस पडला तर वरंब्यात पाणी मुरून पिकाला योग्य प्रमाणात उपलब्ध होते.

बदलत्या पाऊसमानाचा विचार करून रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने केलेल्या पेरणीचा फायदा दिसून येत आहे. बीबीएफ यंत्राच्या साह्याने पेरणी केली असता १५ ते ३० टक्के उत्पादनात वाढ होते कारण या यंत्राच्या साहाय्याने रुंद वरंब्यावर पेरणी केली जाते. तसेच पेरणी केलेल्या ओळीच्या बाजूने सरी केल्यामुळे अतिपावसात पाणी मुरण्यास मदत होते. पिकाच्या वाढीच्या वेळेस त्या ओलाव्याची मदत होते. पिकाची झपाट्याने वाढ होते.

BBF
Automatic Sowing Machine : स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्राने करा पेरणी

हे यंत्र ट्रॅक्टरचलित आहे. यंत्राच्या साहाय्याने कापूस, कांदा, सोयाबीन, मका, हरभरा, तूर, भुईमूग, उडीद, मूग, ज्वारी इत्यादी पिकाची टोकण पद्धतीने वरंब्यावर पेरणी करावी. पेरणीच्या या पद्धतीमुळे जास्त पाऊस पडला तर अतिरिक्त झालेले पाणी रुंद वरंब्यातून सरीद्वारे शेतातून बाहेर निघून जाते. योग्य किंवा कमी प्रमाणात पाऊस पडला तर वरंब्यात पाणी मुरून पिकाला योग्य प्रमाणात मिळते. वरंब्यामध्ये हवा खेळती राहिल्यामुळे पिकांची चांगली वाढ होते, पीक काढणी चांगल्या पद्धतीने करता येते.

उत्पादनामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते. बियाणांमध्ये बचत व एकसमान अंतरावर पेरणी करता येते.

रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केल्याने परतीच्या पावसाच्या पाण्याचे सरीद्वारे संवर्धन तसेच निचरा झाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.

यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते. पिकाची सुधारित पद्धतीने लागवड केल्याने रोपांची संख्या योग्य राखता येते. योग्य पद्धतीने पीक व्यवस्थापन करता येते.

BBF
Onion Sowing Machine: कांदा रोपवाटिकेत बियाणे पेरणीसाठी यंत्र विकसित

अवकाळी पाऊस, शेतात जमा झालेले पाणी सरीत संवर्धित होते. अतिरिक्त पाणी सारीद्वारे बाहेर काढता येते.

अती पावसात सपाट पेरणी पद्धतीने पेरणी केलेले सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे नुकसान झालेले दिसते. परंतु बीबीएफ पद्धतीने केलेल्या पेरणीमुळे पीक वाचते. पिकाभोवती पाणी जमा न होता सरीमध्ये साचून मूलस्थानी जलसंधारणाचा फायदा होतो.

बीबीएफ यंत्र नसल्यास

ट्रॅक्टरचलित बीबीएफ टोकण यंत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी बैलचलित किंवा ट्रॅक्टरचलित टोकण यंत्राने पेरणी करावी. त्यानंतर एकवीस दिवसांनी रिजरने पिकाच्या चार ओळीनंतर सरी तयार करावी. म्हणजे जल व मृद्संधारण व्यवस्थितपणे करता येते.

आपल्याकडील वापरातील कोणतेही पेरणी यंत्र जसे की, ३ दाती, ५ दाती किंवा ७ दाती यातील मधले दात बाद करावे. समजा आपल्याकडे पाच दाती पेरणी यंत्र आहे.यातील मधले दात बंद केले तर आपल्याला दर चार ओळींनंतर एक ओळ मोकळी मिळेल. त्या ओळीमध्ये बळीराम नांगर किंवा कोळप्याला दोरी बांधून सरी काढून घेऊ शकतो.

अगोदर रिजरच्या साह्याने गादीवाफा तयार करून टोकण यंत्राच्या साह्याने पेरणी करता येते.

तंत्रज्ञानाचे फायदे

परतीच्या पावसाच्या पाण्याचे सरीमध्ये संवर्धन होते.

जास्त पाऊस झाल्यास पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होतो.

सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते.

सरीमुळे माती भुसभुशीत राहते.यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते.

पीक उत्पादनात १५ ते ३० टक्के वाढ होते.

यंत्राच्या साहाय्याने पेरलेल्या जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा ओलावा जास्त काळ टिकून रहातो. रोपांची वाढ चांगली होते.

यंत्रामुळे पेरणी कमी वेळेत होते. योग्य प्रकारे दोन ओळीतील अंतर ठेवल्याने आंतरमशागत करता येते.

पारंपरिक पद्धतीपेक्षा उत्पादनामध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते.

-वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४

( विषय विशेषज्ञ, कृषी शक्ती व अवजारे अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com