
Food Processing : तीळ बियांच्या एकूण वजनाच्या सुमारे १७ टक्के वजन त्यावरील सालीचे असते. कवचामध्ये ऑक्सालिक ॲसिड आणि अयोग्य तंतूंचे प्रमाण असते. ऑक्सालिक ॲसिड अन्नातील कॅल्शिअमच्या जैविक वापराचे प्रमाण कमी करू शकते, चवीवर परिणाम करू शकते.
साल काढल्यानंतर तीळ बियांमधील ऑक्सालिक ॲसिडचे प्रमाण ३ टक्यांवरून ०.२५ टक्क्यापर्यंत कमी झाल्याने प्रथिनांची पचनक्षमता सुधारते. त्यामुळे प्रक्रियेच्या दृष्टीने तिळाची साल काढणे आवश्यक आहे. तीळ हे फॅटी ॲसिड्स आणि फाइटोस्टेरॉल्सचा उत्कृष्ट स्रोत आहे.
साल काढणारे यंत्र
तिळाची साल काढणारे यंत्र सहजपणे हाताळता येते. गिअर शाफ्ट यंत्रामधील मिक्सरला फिरवतो. यामुळे तिळाची साल मोकळी होते. या प्रक्रियेत पाणी वापरले जाते, ज्यामुळे साल सहजपणे सुटते. तुटलेली साल हलकी असल्यामुळे दाण्यांपासून वेगळी होते.
यंत्रामध्ये साल आणि दाणे वेगळे करण्यासाठी विशेष यंत्रणा असते. हलके वजन असलेली साल एकीकडे निघून जाते, आणि जड दाणे वेगळ्या भागात साठवले जातात. यंत्रामुळे तिळावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे वेळ आणि मेहनत वाचते. यंत्र चालविण्यासाठी विशेष कौशल्याची गरज नाही.
दाणे स्वच्छ होतात. प्रक्रिया वेगवान आणि अचूक होते.
वेळ आणि श्रमाची बचत.
यंत्राचा तपशील
क्षमता (किलो/तास) ३०० किलो/तास
शक्ती ३ किलोवॉट
साहित्य स्टेनलेस स्टील
व्होल्टेज ४४० व्होल्ट्स
साल काढलेल्या तीळ बियांची गुणवत्ता
रंग पांढरा
सुगंध शुद्ध तीळ सुगंध
आर्द्रता ५ टक्के
अशुद्धता ०.१ टक्का
असामान्य रंग २ टक्के
तिळातील पोषणतत्त्वे (प्रति १०० ग्रॅम)
पोषणतत्त्व मात्रा
आर्द्रता (टक्के) ४.७
चरबी (टक्के) ५१.९
कार्बोहायड्रेट (टक्के) १८.४
प्रथिने (टक्के) १९.८
तंतू (टक्के) १०.८
ॲश (टक्के) ५.२
जीवनसत्त्व अ ८.९२ मिग्रॅ
थायमिन ०.८३ मिग्रॅ
रिबोफ्लॅविन ०.३६ मिग्रॅ
जीवनसत्त्व डी ११.५७ मिग्रॅ
जीवनसत्त्व सी ६.२१ मिग्रॅ
जीवनसत्त्व ई २८.४६ मिग्रॅ
जीवनसत्त्व के १९.५७ मिग्रॅ
कॅल्शिअम ४७३ मिग्रॅ/१०० ग्रॅम
फॉस्फरस ४६६ मिग्रॅ/१०० ग्रॅम
पॉटॅशियम ४६५ मिग्रॅ/१०० ग्रॅम
मॅग्नेशिअम ४१२ मिग्रॅ/१०० ग्रॅम
लोह ६.२१ मिग्रॅ/१०० ग्रॅम
सीलेनियम ०.०३ मिग्रॅ/१०० ग्रॅम
झिंक ८.७८ मिग्रॅ/१०० ग्रॅम
मॅंगनीज ५.९० मिग्रॅ/१०० ग्रॅम
- प्रीती भोसले ८७६७९२०३८४
(सहायक प्राध्यापक, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, सरळगाव, जि. ठाणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.