Sesame Cultivation : औषधी गुणधर्मामुळे काळ्या तिळाची शेतीला पसंती

Sesame Sowing : यंदाच्या रब्बी हंगामात काळ्या तिळाची लागवड ६४४ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे.
Sesame Crop
Sesame CultivavtionAgrowon
Published on
Updated on

Palghar News : पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये औषधी गुणधर्म असलेल्या काळ्या तिळाची लागवड केली जाते. यंदाच्या रब्बी हंगामात काळ्या तिळाची लागवड ६४४ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे. पाच तालुक्यांपैकी पालघरमध्ये सर्वाधिक ३८५ हेक्टर, तर विक्रमगडमध्ये १४० हेक्टर क्षेत्रात तिळाची लागवड करण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यात काळ्या तिळाचे उत्पादन घेणारा पालघर जिल्हा असून, सर्वाधिक लागवड पालघर तालुक्यात केली जाते. पेरणी आणि मशागत खर्च अत्यल्प असल्याने खरीप हंगाम संपताच तिळाच्या पेरणीकडे शेतकरी वळतात. सूर्या आणि वैतरणा नदी काठच्या चिकन मातीत काळ्या तिळाची लागवड केली जाते.

Sesame Crop
Sesame Jaggery Benefits : आरोग्यदायी तीळगूळ शरिरासाठी किती फायदेशीर?

जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, तूर, भुईमूग, कुळीथ आदी पिके घेतली जातात. तीळ लागवडीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. सूर्या आणि वैतरणा नदी किनारच्या बहाडोली, दहिसरतर्फे मनोर, कुडे, चहाडे, सागावे, गिरनोली, लालठाणे, तांदूळवाडी, पारगावसह इतर काही गावांमध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांपासून तिळाची लागवड केली जाते.

सुरुवातीला १०० ते १२५ हेक्टर असलेले पालघर तालुक्यातील तीळ लागवडीचे क्षेत्र ३८५ हेक्टरहून अधिक क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. उत्पादित काळ्या तिळापासून घरगुती वापरासाठी तेल तयार करण्यापलीकडे शेतकरी लक्ष देत नसल्यामुळे लागवड क्षेत्र वाढत नसल्याचे बोलले जाते.

Sesame Crop
Sesame Cultivation : सलग, आंतरपीक, मिश्रपीक म्हणून लागवड करा उन्हाळी तिळाची

सरकारकडून प्रोत्साहन

तिळाची लागवड करताना शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढवण्याची गरज आहे. कृषी विभाग प्रयत्नशील असताना शेतकऱ्यांकडून तीळ लागवडीकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.

वैतरणा आणि सूर्या नदीलगतच्या शेतीत काळ्या तिळाची लागवड केली जात असून, तिळाच्या औषधी गुणधर्मामुळे मोठ्या प्रमाणात मागणी असूनही उत्पादनाकडे लक्ष देण्यात आले नाही. कृषी विभागाकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कार्यक्रमअंतर्गत शेतकऱ्यांना तीळ लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

तीळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे, तसेच शासकीय योजनांमधून आवश्यक द्रव्य रूपातील खत, तसेच इतर सामग्री, तसेच शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास रब्बी हंगामात काळ्या तिळाच्या लागवडीत वाढ होईल. अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी काळ्या तिळाच्या लागवडीकडे वळतील.
- मुकेश पाटील, शेतकरी, खामलोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com