Food Packaging Technology : खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी तंत्रज्ञान

Food Tech : नाशिवंत अन्नपदार्थांची टिकवण क्षमता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने संशोधित वातावरण पॅकिंग, सक्रिय पॅकिंग आणि जैविक पॅकेजिंगचा समावेश आहे.
Food Packaging Technology
Food Packaging TechnologyAgrowon
Published on
Updated on

रोहन जाधव,डॉ. पल्लवी देवकाते

Eco Friendly Packaging : नाशिवंत अन्नपदार्थांची टिकवण क्षमता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने संशोधित वातावरण पॅकिंग, सक्रिय पॅकिंग आणि जैविक पॅकेजिंगचा समावेश आहे. अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये सेन्सर्स आणि निर्देशकांचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानामुळे अन्नाच्या ताजेपणा आणि सुरक्षा याबद्दल माहिती मिळते.

नाशवंत अन्नपदार्थ जसे, की फळे, भाज्या, मांस, आणि दुग्धजन्य पदार्थांचे काढणीपश्चात व्यवस्थापनाच्या अभावामुळे नुकसान होते. कारण ही उत्पादने झपाट्याने खराब होऊ शकतात. यामुळे अन्नसुरक्षेचा धोका निर्माण होतो. तसेच उत्पादक आणि ग्राहक यांच्यासाठी आर्थिक नुकसान ठरते.

प्रभावी पॅकिंग उपाय हे नुकसान कमी करण्यास मदत करतात. पॅकेजिंगमधील नवीन तंत्रज्ञान नाशवंत अन्नपदार्थांची गुणवत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी, आणि अपव्यय कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. नाशवंत अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांचा वाढ होते. तसेच हाताळणी दरम्यान नुकसान होते. जैविक, भौतिक, पर्यावरणीय, आणि आर्थिक घटक या सर्व गोष्टी नुकसानीला कारणीभूत ठरतात.

Food Packaging Technology
Food Packaging : खाद्यपदार्थांच्या गरजेनुसार पॅकेजिंगचे प्रकार

नाशिवंत अन्नपदार्थांमध्ये काढणीपश्चात नुकसानीची अनेक कारणे आहेत. जैविक घटकांमध्ये सूक्ष्मजीवांमुळे खराब होणे, एन्जाइमद्वारे होणारे रासायनिक बदल आणि अन्नातील घटकांमध्ये बदल यांचा समावेश होतो, ज्यामुळे अन्नाचा वाया जाण्याचा वेग वाढतो. भौतिक घटकांमध्ये कापणी, हाताळणी, आणि वाहतुकी दरम्यान यांत्रिक नुकसान यांचा समावेश आहे. हे उत्पादनाची गुणवत्ता खूप कमी करू शकते. पर्यावरणीय घटकांमध्ये तापमानातील चढ-उतार, आर्द्रता आणि प्रकाशाच्या संपर्कामुळे देखील खाद्यपदार्थ खराब होण्याचा दर वाढतो.

पॅकेजिंगमधील नवीन तंत्रज्ञान

नाशवंत अन्नपदार्थांचे संरक्षण सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने मुख्यतः संशोधित वातावरण पॅकिंग, सक्रिय पॅकिंग आणि जैविक पॅकेजिंगचा समावेश आहे.

संशोधित वातावरण पॅकिंग

संशोधित वातावरण पॅकिंग म्हणजे अन्न संरक्षणासाठी वायूचा वापर केला जातो. यामध्ये ऑक्सिजनच्या पातळीला कमी करून आणि कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजनची एकाग्रता वाढवून नाशवंत अन्नपदार्थांची साठवण क्षमता वाढते. हे तंत्रज्ञान मुख्यतः फळे, भाज्या, आणि मांस उत्पादनांसाठी वापरले जाते, ज्यामुळे ताजेपणा टिकवण्यास आणि खराब होण्यापासून वाचवते.

सक्रिय पॅकिंग

सक्रिय पॅकिंग हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रतिबंध करण्यासाठी रोगाणूरोधक घटक बाहेर सोडू शकते. अशा प्रकारचे पॅकिंग विशेषतः बेकरी उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ, आणि स्नॅक्ससाठी उपयुक्त आहे, ज्यामुळे ताजेपणा टिकवून ठेवता येतो आणि साठवण क्षमता वाढवता येते.

Food Packaging Technology
Agriculture Technology : शेती यांत्रिकीकरणात कौशल्याला विशेष महत्त्व

सेन्सर्स, निर्देशकांचा वापर

अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये सेन्सर्स आणि निर्देशकांचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानामुळे अन्नाच्या ताजेपणा आणि सुरक्षा याबद्दल माहिती मिळते. तापमान निर्देशक असामान्य तापमानात रंग बदलू शकतात. ताजेपणाचे निर्देशक ग्राहक आणि वितरण करणाऱ्यांना अन्नाच्या गुणवत्तेबद्दल दृश्य संकेत देतात. समुद्री अन्न आणि मांस उत्पादनांमध्ये हे तंत्रज्ञान वापरतात.

जैविक पॅकिंग

जैविक पॅकिंग हे स्टार्च, सेल्यूलोज, किंवा इतर जैविक पॉलीमर्सपासून बनवलेले असते. कालांतराने याचे विघटन होते. फळे आणि भाज्यांवर संरक्षणात्मक थर दिला जातो. यामुळे आर्द्रता राखण्यासाठी आणि खराब होण्यास प्रतिबंध होतो. या प्रकारचे पॅकिंग फळे, भाज्या, आणि स्नॅक्ससाठी विशेषतः उपयुक्त आहे.

व्हॅक्यूम पॅकिंग

अन्नपदार्थांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी उपयुक्त आहे. या प्रक्रियेमध्ये पॅकेजमधून हवा पूर्णतः काढून टाकली जाते आणि नंतर पॅकिंग बंद केले जाते. यामुळे ऑक्सिजन, जिवाणू, बुरशी यांसारख्या अन्नपदार्थ बिघडवणाऱ्या घटकांचा परिणाम कमी होतो. ऑक्सिजन काढून टाकल्यामुळे अन्नाचा रंग, चव आणि पोत टिकतो, तसेच जिवाणूंची वाढ थांबते. यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होत नाहीत. वितरण आणि साठवणूक सोईस्कर होते, तसेच पॅकेजिंग स्वच्छ आणि आकर्षक दिसते.

व्हॅक्यूम पॅकेजिंगचा उपयोग फळे, भाजीपाला, मांस, मासे, शिजवलेले पदार्थ, ड्राय फ्रूट्स, नट्स आणि डेअरी उत्पादने टिकवण्यासाठी केला जातो. ही पद्धत पदार्थांचा ताजेपणा टिकवते, बाष्प आणि तेल वाचवते, तसेच जिवाणूंच्या वाढीला प्रतिबंध करते. हे तंत्रज्ञान ग्राहकांना उच्च-गुणवत्तेचे उत्पादन पुरवणे, साठवणुकीचा खर्च कमी करणे आणि उत्पादनांची ताजेपणाची हमी देते. या पद्धतीचे पॅकिंग करण्यासाठी यंत्राची किंमत जास्त आहे. उच्च दर्जाचे सीलिंग साहित्य लागते.

- डॉ. पल्लवी देवकाते, ९९२१९०९२७०, (डॉ. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ एमबीए अ‍ॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट, बारामती,जि.पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com