

Roha News : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्राद्वारे शेतात भात लागवड केल्याने वेळेची व खर्चाची बचत होते. खरिपातच नव्हे तर रब्बी हंगामातही यंत्राचा वापर शेतकऱ्यांनी करावा, तसेच विविध पिकांची लागवड करावी, असे मार्गदर्शन कृषी अधिकारी परमेश्वर गाढे यांनी रोह्यात केले.
शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न घ्यावे, यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन तसेच अनुदान दिले जात आहे.
तालुक्यातील मौजे चिल्हे येथील शेतकरी रमेश महाडीक यांनी यांत्रिकी साहाय्याने यंदा भात लागवड केली आहे. या भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन रमेश महाडीक व विभागीय कृषी सहायक अधिकारी सारिका सावंत यांनी नुकतेच केले होते. गावागावातील गट स्थापन करून शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.
शेती कामांसाठी मजुरांचा तुटवडा असल्याने आर्थिक दृष्टया परवडणारे यंत्राचा वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते. गट शेतीसाठी सरकारच्या अवजारे बँकेचाही लाभ मिळू शकतो, असे आवाहन गाढे यांनी केले.
लावणीची कामे जोमात
माणगाव (बातमीदार) ः संततधार पावसामुळे तरवे तरारले असून तालुक्यात भात लावणी सुरू झाली आहे. पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरणीबरोबरच भातलावणीलाही यंदा उशीर झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या साधनांसह मजूर, नातेवाईक-मित्रपरिवाच्या मदतीने लागवडीला सुरुवात केली आहे. तालुक्यात १२, ५८९ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची लागवड केली जाते. साधारण १२०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊन रोपे तयार झाली होती. काही दिवसांपासून संततधारेमुळे खरीप हंगामातील भात पेरणी चांगली बहरली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.