Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १०,२१५ हेक्टरवर भात लावण्या

Paddy Farming : जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर १० हजार २१५ हेक्टरवर भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : मोसमी पावसाची सुरवात उशिरा झाल्यामुळे भात लावण्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आठ दिवस समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पुन्हा उघडिप दिल्यामुळे जिल्ह्यातील लावण्यांचा वेग मंदावणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर १० हजार २१५ हेक्टरवर भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत.

मागील आठ दिवसांच्या तुलनेत मंगळवारी आणि बुधवारी (ता. १२) जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. २४ जुनपासून मोसमी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सलग पाऊस पडत होता. गेल्या दोन दिवसात पावसाने उघडीप घेतली आहे. मोसमी पाऊस लांबल्यामुळे पेरण्या उशिराने झाल्या. त्यामुळे भात लावण्यांचे वेळापत्रक पुढे सरकले आहे.

Paddy Farming
Paddy Procurement Scam : भात खरेदी घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

जुन महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात पेरण्या केलेल्या काही ठिकाणी पुरेशी रुजवातच झालेली नाही. आता पुन्हा दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीनंतर कमी कालावधीत तयार झालेली रोपं लावणीसाठी वापरावी लागणार आहेत. जुलैचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीही लावण्यांच्या कामाला वेग आलेला नाही.

Paddy Farming
Paddy Crop Damage : कांदाटी खोऱ्यात भातपीक गवारेड्यांकडून उद्ध्वस्त

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार २१५ हेक्टरवर भात लावण्या पूर्ण झाल्या असून तुलनेत १५ टक्के लावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात ६८ हजार ०८८ हेक्टरवर लागवड केली जाते.

उशिरा आलेल्या पावसामुळे पेरण्या जुनच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु होत्या. सर्वसाधारणपणे ७ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. तसेच खरीपातील अन्य पिकांमधील १० हजार ३९८ हेक्टरपैकी ५१४ हेक्टरवर लावगवड झाली आहे. ४.९५ टक्के लावगड झाली आहे.

तालुका एकुण क्षेत्र भात लावण्या क्षेत्र (हेक्टर)

* चिपळूण १०३१७ १००५

* दापोली ६४१३ ५८०

* खेड १०१५८ २३५०

* गुहागर ३८८९ ३८८

* मंडणगड ३९८० ३९७

* रत्नागिरी ६८३३ ५३०

* संगमेश्‍वर ११५२८ १०५०

* राजापूर ८५३१ ३४१२

* लांजा ६४३५ ५००

समाधानकारक पाऊस असून जिल्ह्यात शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी भाताची लावणी केली जात आहे.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी
धुळपेरणीनंतर पाऊस लांबला तरीही भात रोप रुजून येण्यात अडथळा नसतो. उशिरा पाऊस सुरू झाला तरीही लावणीवर तेवढा परिणाम झालेला नाही. सध्या शेतीला समाधानकारक पाऊस आहे.
- मिलिंद वैद्य, रत्नागिरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com