Agriculture Technology: शेतीकामे सोपी करणारे बहुपयोगी संयंत्र केले तयार

Agriculture Innovation: गरज ही कोणत्याही शोधाची जननी असते. शेतकऱ्यांची कामे सोपे करण्याच्या उद्देशाने सिंदी बु. (ता. अचलपूर, अमरावती) येथील महंमद सलीम शेख सुभान यांनी बहुपयोगी संयंत्र विकसित केले असून, ते पेरणीसह आंतरमशागतीच्या अन्य कामे सुलभ करते. या संयंत्राच्या पेटंटसाठी प्रस्तावही दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
Agriculture Equipment
Agriculture EquipmentAgrowon
Published on
Updated on

Smart Farming Equipment: सिंदी बु. शिवारात महंमद सलीम शेख सुभान यांची साडेसात एकर शेती असून, त्यातील चार एकर कोरडवाहू, तर साडेतीन एकर क्षेत्र बोअरवेल आधारीत बागायती आहे. कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीनसह पारंपरिक घेतात, तर साडेतीन एकरात संत्रा लागवड आहे. संत्रा बागेमध्ये झाडांच्या अधिक उंचीमुळे फवारणीचे कव्हरेज चांगले मिळत नसल्याचे महंमद सलीम यांना दिसत होते.

मशागत आणि आंतरमशागतीतील तण नियंत्रणासाठी दोन बैल व तीन माणसांची आवश्यकता भासे. अधिक वेळ आणि खर्चासोबत मजुरांची उपलब्धता वेळेवर होईलच, याचीही शाश्‍वती नसल्याने कामे प्रभावित होत असल्याचे महंमद सलीम यांनी सांगितले. त्यांचे ‘आयटीआय’ ही अभ्यासक्रम केलेला असल्याने त्यांनी सतत विविध यंत्रविषयक कल्पना सूचत असतात. कोणतीही समस्या किंवा अडचण दिसली की सोडविण्यासाठी त्यांचा विचार सुरू होतो.

Agriculture Equipment
Agriculture Technology: धान्य शुद्धीकरणाची आणि विलगीकरणाची उपकरणे: अत्याधुनिक उपकरणांची ओळख!

...असे आहे यंत्र

पहिल्या टप्प्यात बैलचलित सयंत्राची कल्पना सुचली होती. मात्र त्यासाठी लागणारे बैल आणि मजुरांची गरज लक्षात घेता त्यांनी यांत्रिक पर्यायांचा विचार सुरू केला. त्यांचे स्वतःचे वेल्डिंग मशिनसह छोटे वर्कशॉप आहे. त्यामध्ये मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली. तयार केलेल्या यंत्राच्या शेतामध्येच चाचण्या घेत, सुधारणा करत गेले.

Agriculture Equipment
Agriculture Equipment Policy: कृषी साहित्य खरेदीचे धोरण का बदलले?

पुढे ऑटो रिक्शाची चाके तर मागे ३ फूट उंचीची लोखंडी चाके लावण्यात आली असून, मागे विविध अवजारे जोडण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे पेरणी, डवरणी, फवारणी अशी कामे करतात. ज्वारी, कपाशी, सोयाबीन, हरभरा या पिकाच्या सरीतील तणेही पाच फाळे लावून काढता येतात. साडेसात एचपी डिझेल इंजिनवर चालणाऱ्या सयंत्राद्वारे केवळ अर्धा लिटर डिझेलमध्ये एक एकरातील तण नियंत्रण एक तासात शक्य होते. २०० लिटरची क्षमतेची टाकी बसवून फवारणी यंत्रणाही लावता येते. सयंत्राची किंमत दोन लाख ४० हजार रुपये असून, ते चालकाच्या पुढे राहत असल्याने त्याच्या नजरेसमोर काम होत असते. त्यामुळे कामातील अचूकता साधणे व अन्य नुकसान टाळणे शक्य होत असल्याचे महंमद सलीम यांनी सांगितले.

स्टार्ट अपमध्ये गौरव

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ‘स्टार्ट अप महाराष्ट्र’ स्पर्धेत महंमद यांनी संयंत्र ठेवले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांनी मुंबईत पार पडलेल्या ‘नॅशनल स्टार्ट अप डे’ मध्येही निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांच्या यंत्राचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली होती. या यंत्रासाठी पेटंट संबंधित प्रस्तावही दाखल करण्यात आल्याचे महंमद सलीम यांनी सांगितले.

- महंमद सलीम शेख सुभान ९८९०००४०८३

- महंमद सोहेल ऊर्फ बबलू महंमद सलीम ८४५९९५३९७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com