MPKV Rahuri : एमपीकेव्ही, मिटकॉनमध्ये सामंजस्य करार

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व मिटकॉन कन्स्लटंसी अॅन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि. या दोन संस्थांमध्ये शाश्वत प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) सामंजस्य करार करण्यात आला.
MPKV Mitcon
MPKV MitconAgrowon

पुणे : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agriculture University) व मिटकॉन कन्स्लटंसी अॅन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि. (Mitcon Consultancy And Engineering Pvt Ltd) या दोन संस्थांमध्ये शाश्वत प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) सामंजस्य करार करण्यात आला.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब (Soil Organic Carbon) स्थिरीकरण माती, पाणी आणि हवेतील प्रदूषण कृषिजन्य व घनकचरा व्यवस्थापन (Solid West Management) या क्षेत्रातील संशोधन व विकासकार्यातील सहकार्यासाठी सामंजस्य करारावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे अधिष्ठाता व शिक्षण संचालक डॉ. प्रमोद रसाळ व मिटकॉन कन्स्लटंसी अॅन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक आनंद चलवादे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

MPKV Mitcon
Agriculture Credit : कृषी पतपुरवठा सहकारी संस्था संगणकक्षम होणार!

या प्रसंगी पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, हरित व स्वच्छ कृषी महाविद्यालय समिती, सदस्य सचिव डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, मिटकॉनचे व्हाइस प्रेसिडेन्ट डॉ. संदीप जाधव, मिटकॉनचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट श्रीकांत काकडे, प्रा. डॉ. पंकज रवंदळ, प्रा. डॉ. अभय पाटील आदी उपस्थित होते.

MPKV Mitcon
Sugar : साखरेचा विक्री दर त्वरित वाढवण्याची गरज

आगामी काळात शहरी विभागातील घनकचरा व्यवस्थापन, शेत जमिनीतील काडी-कचरा व्यवस्थापन, जमिनीतील व हवा प्रदूषणविषयक समस्या सोडविण्यासाठी संशोधन प्रकल्प हाती घेऊन तंत्रज्ञान निर्मितीसाठी परस्पर सहकार्यासाठी हा करार करण्यात आला. या करारामुळे हरित व स्वच्छ पुणे कृषी महाविद्यालय परिसर या प्रकल्पास खूप मोठा फायदा होणार आहे, अशी हरित व स्वच्छ कृषी महाविद्यालय समिती, सदस्य सचिव, डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी दिली.

शाश्वत प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैश्विक तपमान वाढीच्या परिस्थितीत शेत जमिनीतील सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. शहरी भागातील कुजण्यायोग्य घनकचऱ्यापासून सेंद्रिय खते निर्मिती तसेच माती, पाणी व हवेतील प्रदूषणांत महत्त्वाचे संशोधन कार्य साकारण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ व मिटकॉन यांच्यामधील सामंजस्य करारामधून मोठी मदत होणार आहे.
डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com