KVK Darwha: केव्हीके दारव्हाने पेरले समृद्धीचे बीज

Rural Development: यवतमाळ जिल्ह्यात समृद्धीचे बीज रोवण्याचा प्रयत्न दारव्हा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून होत आहे. माती. पाणी, पीक व्यवस्थापनातून ते पूरक, प्रक्रियेतील सुधारित तंत्रज्ञानाचा केव्हीकेने हजारो शेतकऱ्यांपर्यंत त्याचा प्रसार केला आहे. त्यातून शेतकऱ्यांना आपले अर्थकारण उंचावणे शक्य झाले आहे.
KVK Darwha
KVK DarwhaAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology: महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा किंवा कॉटन सिटी अशी यवतमाळची ओळख आहे. १६ तालुके असल्याने कृषी विस्ताराला बळ देण्यासाठी जिल्ह्यात दोन कृषी विज्ञान केंद्रांची (केव्हीके) संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानुसार एक केव्हीके डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत आहे.

तर नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ (दारव्हा) अंतर्गत दुसऱ्या केव्हीकेचे कामकाज चालते. दारव्हा तालुका ठिकाणापासून २५ किलोमीटर तर कारंजा (लाड, वाशीम) या तालुका ठिकाणापासून १५ किलोमीटरवर सांगवी (रेल्वे) गावशिवारात हे केव्हीके वसले आहे. दारव्हा, नेर, दिग्रस, महागाव, आर्णी, पुसद आणि उमरखेड या सात तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र या केव्हीके अंतर्गत आहे.

डॉ. नंदकिशोर हिरवे हे केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख असून वासुदेव चांदुरकर विषय विशेषज्ज्ञ (विस्तार शास्त्र) आहेत. शेतीतील विविध तंत्रज्ञान केव्हीकेने उपलब्ध केले आहे. त्यातील काही ठळक बाबी पुढीलप्रमाणे.

KVK Darwha
Teacher Success Story: साहित्यिक शिक्षक : एकनाथ आव्हाड

पीक उत्पादन

शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग घेऊन प्रशिक्षणासह प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिके.

वीसहून अधिक सामूहिक प्रत्यक्षिकांद्वारे तेलबिया व डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्यावर भर.

संत्रा पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याचे नियोजन, तूर- हरभऱ्यातील कीड नियंत्रण, हरभरा पिकावर ०.५ टक्का झिंक सल्फेटची फवारणी, बीटी कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व बोंडसडचे व्यवस्थापन,

महिलांचे श्रम कमी करण्यासाठी सोयाबीन सोंगणी करताना हातमोज्यांचा.

परसबाग व्यवस्थापन

आदिवासी बहुल भागासाठी साई सरबती लिंबूवाणाला उत्तेजन. आदिवासी प्रकल्पांतर्गत अवजार बॅंकेची उभारणी व भाडेतत्त्वावर यंत्रांचा पुरवठा.

साठवणुकीचे धान्य अधिक काळ टिकण्यासाठी सुपर ग्रेन बॅग तंत्राचा प्रसार.

रोपवाटिकेद्वारे उसाच्या सुधारित वाणांचे बेणे उपलब्ध.

माती तपासणी प्रयोगशाळा

तेलबिया लागवडीस प्रोत्साहन

दारव्हा व लगतच्या गावांमध्ये पूर्वी भुईमूग पिकावर शेतकऱ्यांचा अधिक भर होता. यात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकता खालावली. परिणामी, शेतकऱ्यांना उन्हाळी तिळाच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. आता तीळक्षेत्रात वाढ झाली आहे. ‘अटारी’ पुणे यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतावर सामूहिक पीक प्रात्यक्षिके व तेलबिया उत्पादन वाढीसाठी ‘मॉडेल तेलबिया शिवार’ हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत सोयाबीनमध्ये एकात्मिक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञाना सह पीडीकेव्ही अंबा व जेएस ९३०५ यासारख्या वाणांच्या प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला आहे. जवस, भुईमूग पिकांतही तंत्रज्ञान विस्तारावर भर आहे.

पूरक- प्रक्रिया तंत्र

बीटल जातीचे शेळीपालन युनिट. बोकड व शेळी विक्री. शेळी वजन वाढीसाठी पशुखाद्य व अझोल्याचा वापर.

अळिंबी उत्पादन

अंडी देणाऱ्या गिरिराज ब्रीडचे परसबागेतील कुक्‍कुटपालन.

पशुगणनेनुसार जिल्ह्यात एक लाखाहून अधिक गाई व तीस हजारांपर्यंत म्हशी. त्या दृष्टीने बहुवार्षिक चारा पिकांचा प्रसार. दुधातील प्रथिनांचे प्रमाण व शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्षाला सरासरी २५ हजार रुपयांनी वाढण्यास मदत.

KVK Darwha
Agriculture Success Story: शेतीतील नवा प्रयोगशील मार्गदर्शक: अभिजित घुले यांची यशोगाथा

हळद पावडर निर्मिती

केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली मुढाणा (ता. महागाव) येथे गोल्ड ग्राम शेतकरी उत्पादक कंपनीची सप्टेंबर २०१९ रोजी स्थापना करण्यात आली. त्याचे ५०० भागधारक आहेत. हळद उत्पादकांचे संघटन, हळद लागवड, पावडर निर्मिती व विक्री असा कंपनीचा प्रयत्न आहे. या शेतकऱ्यांना केव्हीकेच्या माध्यमातून कुरकुमीनचे प्रमाण चांगले असलेल्या प्रगती या हळद वाणाचे बेणे उपलब्ध करून देण्यात आले. कंपनीच्या सदस्यांनी सामूहिक लागवडीतून वार्षिक सुमारे २०० टन उत्कृष्ट हळद पावडरीची निर्मिती केली. कमी कालावधीचे वाण असल्याने काढणीनंतर उन्हाळी तीळ घेऊन अतिरिक्‍त नफाही मिळवला.

ग्रामीण उद्यमशीलतेवर भर

ग्रामीण भागातील युवक, युवती, विस्तार कार्यकर्ता यांच्यासाठी २५० हून अधिक प्रशिक्षणे घेऊन आठ हजारांवर लोकांना प्रशिक्षित करण्यात आले. यात फळबाग अळिंबी उत्पादन, मसाले प्रक्रिया, शेळीपालन आदी विषयांचा समावेश राहिला. प्रक्षेत्र भेटी, शेतीदिन, कार्यशाळा, जनावरे आरोग्य तपासणी शिबिर आदी स्वरूपात वर्षाला दीडशेहून अधिक कार्यक्रम घेण्यात येतात. त्याद्वारे सात हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. रेडिओ, टीव्ही टॉक, सोशल मीडियाचाही प्रभावी वापर विस्तारात होतो.

केव्हीकेमार्फत प्रशिक्षण घेतल्यानंतर अळिंबीवर आधारित चॉकलेट, पावडर आदी मूल्यवर्धित पदार्थाची निर्मिती केली. विक्रीतून वर्षाला ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. या कार्याची दखल घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख, अकोला कृषी विद्यापीठामार्फत भरारी पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आले याचा आनंद आहे.
सौ. कविता येवले, पाळोदी, दारव्हा
केव्हीकेकडून बहुवार्षिक चारा उत्पादन व दर्जासुधारा विषयी माहिती मिळाली. वर्षाकाठी दोन हेक्‍टरवर मी चारा लागवड करतो. पौष्टिक चाऱ्यामुळे दूध उत्पादनात १५ ते २० टक्‍के वाढ झाली आहे. वर्षाला ६० हजार रुपयांचे उत्पन्न येते. ठोंब, बेणे विक्रीतूनही चांगला पैसा हाताशी येतो.
प्रशांत बिजवे, लोही, दारव्हा
मी केव्हीकेचा संपर्क शेतकरी आहे. येथेच मला ड्रॅगन फ्रूटविषयी कळाले. त्यातून लागवडीचा प्रयोग केला. जिल्ह्यातच त्यास बाजारपेठ मिळाली आहे.
अमोज चव्हाण, गांधीनगर, दिग्रस
Summary

वासुदेव चांदुरकर, ७९७२१६२९६७ विषय विशेषज्ञ (विस्तार शास्त्र)

डॉ. नंदकिशोर हिरवे, ९४२११४९३२३ वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, केव्हीके दारव्हा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com