Cabbage Harvester : चांदवडच्या विद्यार्थ्यांनी विकसित केला छोटा ट्रॅक्टर चलित कोबी हार्वेस्टर

Agriculture Mechanization : चांदवड (नाशिक) येथील ‘एसएनजेबी’चे चांदवड येथील श्री. हिरालाल हस्तिमल (जैन बंधू, जळगाव) पॉलिटेक्निकमधील यंत्र अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी छोट्या ट्रॅक्टरला जोडता येईल, असे छोटे कोबी कापणी व संकलन यंत्र विकसित केले आहे.
Small Tractor Driven Cabbage Harvester
Small Tractor Driven Cabbage HarvesterAgrowon
Published on
Updated on

Farm Mechanization : नाशिकसारख्या शेतीमध्ये पुढारलेल्या जिल्ह्यातील चांदवडसारख्या भागामध्ये ‘एसएनजेबी’ शिक्षणसंस्थेमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या समस्या लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रकल्पांना श्री. हिरालाल हस्तिमल (जैन बंधू, जळगाव) पॉलिटेक्निक मधील प्राध्यापक प्रोत्साहन देत असतात. यंत्र अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी विकास मोरे, प्रशांत गायकवाड, आदित्य झालटे, सहदेव डोळसे, सौरभ वाघचौरे, नेहा गांगुर्डे, स्नेहल हांडगे यांनी कोबी काढणीचे यंत्र विकसित केले आहे.

या टीममधील विद्यार्थ्यांना यंत्र निर्मितीसाठी ६० दिवसांचा कालावधी लागला असून, त्यास ९७ हजार रुपये इतका खर्च आलेला आहे. यंत्र विकसित झाल्यानंतर चांदवड तालुक्यातील आंबेगाव, चांदवड शिवार, डावखर नगर परिसरात कोबी काढणी प्रात्यक्षिक चाचण्या घेतलेल्या आहे.

Small Tractor Driven Cabbage Harvester
Agriculture Mechanization : ‘हार्वेस्टर’द्वारे मजुरी समस्येवर उपाय

त्यासाठी वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा. योगेश काकुस्ते, प्रा.अमोल नानकर, प्रा. शैलेश पारखे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्प निर्मितीबद्दल विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. डी. व्ही. लोहार यांसह संस्थेच्या व्यवस्थापनाने कौतुक केले आहे.

Small Tractor Driven Cabbage Harvester
Agricultural Mechanization : कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी ७५ कोटींचा निधी; ३१ मार्चपूर्वी वितरित करण्याचे निर्देश

यंत्राची संरचना व कार्यपद्धती :

- यंत्राच्या वापरासाठी २५ ते ३५ अश्‍वशक्तीपर्यंत ट्रॅक्टर पुरतो.

- ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस सहा फुटाचे रिपर जोडले असून, ते ‘पीटीओ’च्या ऊर्जेवर चालवले जाते.

- कोबी कापणीसाठी देठापासून कापण्यासाठी नऊ पात्यांचा वापर होतो.

- आवश्यकतेनुसार शेतीत यंत्र खाली - वर हालचाल करण्यासाठी हायड्रॉलिक पंप बसविला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालक हे यंत्र सहजपणे चालवू शकतो.

- रिपरद्वारे कापणी केल्यानंतर तो कोबी गड्डा कन्व्हेअरवर जातो. तिथून तो ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या ट्रॉलीमध्ये सुलभरीत्या संकलित केला जातो.

- कोबी संकलनासाठी बसवलेली ट्रॉली रुंदी १०९ सेंमी, लांबी १७७ सेंमी आणि उंची १२० सेंटिमीटर आकाराची असून, त्यात २ टन कोबी बसतो.

यंत्राचे फायदे असे :

- ट्रॅक्टरचलित असल्याने वापरण्यास सोपे.

- एक एकरसाठी इंधनाचा (डिझेल) खर्च ७०० रुपये येतो.

- या यंत्राद्वारे एका दिवसात ५ एकर कोबी कापला जातो.

- एका दिवसात पाच एकर कोबी काढता येतो.

- जलद कामासोबत मजुरी व खर्च बचत.

संपर्क : प्रा. योगेश काकुस्ते, ९४२०५३६७७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com