Tractor Sellection : शेतीकामासाठी कोणता ट्रॅक्टर बेस्ट?

Team Agrowon

ट्रॅक्टरच्या वापरातून कर्जाची परतफेड वेळेवर करण्यासोबतच स्वतःच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय भर पडणे गरजेचे असते. त्यासाठी आपल्या ट्रॅक्टरची क्षमता कमी किंवा अधिक असून चालणार नाही. योग्य त्या क्षमतेचाच ट्रॅक्टर खरेदी केला पाहिजे.

Tractor Sellection | Agrowon

ट्रॅक्टरची ताकद ठरविताना सर्वात अवजड आणि वेळ खाऊ काम विचारात घ्यावे.

Tractor Sellection | Agrowon

ट्रॅक्टरची अश्‍वशक्ती ठरविणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे एखादे शेतीकाम करण्यासाठी लागणारा वेळ होय. वर्षात एकापेक्षा जास्त पिके घेताना त्यातील प्रत्येक कामाची वेळ आपल्या स्वतःच्या चार ते पाच वर्षाच्या अनुभवावरून लक्षात घ्यावी.

Tractor Sellection | Agrowon

डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहे. अशा स्थितीमध्ये कमी इंधनावर चालणारा ट्रॅक्टर केव्हाही सरस. यामुळे भारतीय मानक संस्थेने इंधन खर्चाच्या काही मर्यादा घातलेल्या आहेत.

Tractor Sellection | Agrowon

काही वेळा ट्रॅक्टर कमी इंधन खात असला तरी त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणारा खर्च जास्त असू शकतो. त्यामुळे सर्व बाजूंनी व्यवस्थित पडताळणी करून निर्णय घ्यावा.

Tractor Sellection | Agrowon

नांगरणीसारखी अवजड कामे करताना, अवजाराची खोली एकसारखी ठेवून ताकद कमी जास्त करणाऱ्या हायड्रॉलिक प्रणालीपेक्षा ताकद कायम ठेवून अवजाराची खोली कमी जास्त करणारी प्रणाली केव्हाही चांगली

Tractor Sellection | Agrowon

ट्रॅक्टर चालविताना तो चालकासाठी आरामदायक असावा. वेगवेगळ्या लिव्हर, मीटर, बटण यांच्या योग्य जागा तसेच कमीत कमी व्हायब्रेशन आवश्यक असते.

Tractor Sellection | Agrowon
आणखी पाहा...